डॅनियल रोश याला बासोन ग्लेशियरवर मानवी देहाचे काही अवशेष मिळाले आहेत. भारतीय
विमानातील अवशेष 1966 साली दुर्घटनाग्रस्त झालेल्या प्रवाशांचे असण्याची शक्यता आहे. एयर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील हे असावे असा अंदाज आहे, हे सुमारे ५० वर्षापूर्वीचे आहेत. डॅनियल रोश गेली अनेक वर्षे पर्वतावरील आपले संशोधनाचे कार्य करत आहे.
प्रथमच मानवी देहांचे अवशेष मिळाले अवशेष 1966 साली दुर्घटनाग्रस्त झालेल्या भारतीय विमानातील प्रवाशांचे असावेत. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एयर इंडियाचे बोइंग 707 विमान आल्प्स पर्वतावर दुर्घटनाग्रस्त होऊन त्यातील सर्व-117 प्रवासी मरण पावले होते. शोधकार्यात डॅनियल रोशला चार जेट इंजिन्सही सापडली आहेत. हे संशोधन पुढे सुरु राहणार असून यामध्ये अचूक असे शोध लागणार आहे. नेमके हे विमान का आणि कसे पडले की पाडले गेले होते याचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे.