Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खराब हवामानामुळे अँकर घसरल्याने कराचीच्या सीव्हयू किनाऱ्यावर मालवाहक जहाज अडकले

Webdunia
शुक्रवार, 23 जुलै 2021 (17:36 IST)
कराची खराब हवामानामुळे अँकरगेज खराब झाल्यामुळे कराचीमधील सी व्ह्यू समुद्र किनाऱ्या जवळ मालवाहक जहाज किनाऱ्या जवळ आले. कोविड -19 जागतिक महामारीआणि मान्सून हंगामात मुळे अधिकाऱ्यांनी हा परिसर बंद केला असूनही कुतूहल असणाऱ्यांची गर्दी हे जहाज बघण्यासाठी करत आहे. 'एमव्ही हेंग टोंग' हे जहाज बुधवारी किनाऱ्यावर आले. हाँगकाँग आधारित कंपनीच्या मालकीचे हे जहाज 98 मीटर लांबीचे आणि 20 मीटर रूंदीचे असून 3,600 डेडवेट टनेज (डीडब्ल्यूटी) ची क्षमता आहे. हे 2010 मध्ये बांधले गेले होते. गुरुवारी पहाटेपर्यंत हे जहाज काढले जाऊ शकले नाही.
 
कराची पोर्ट ट्रस्टच्या (केपीटी) अधिका-याने सांगितले की, मालवाहक जहाज शांघायहून तुर्कीच्या इस्तंबूलकडे जात होते आणि कराची बंदरात प्रवेश करण्यापूर्वी त्याचा अँकर गळून किनाऱ्यावर आदळले. ते म्हणाले की खराब हवामानामुळे अँकर उन्मळून पडल्याने ते पाकिस्तानात पाण्याच्या क्षेत्रात  आले.तसेच क्रू मेंबरची जागा घेण्याची वाट पाहत असल्याचेही ते म्हणाले.
 
या अधिकाऱ्याने सांगितले की केपीटीने पाकिस्तान मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीला (पीएसएमए) माहिती दिली पण तेही फारसे मदत करू शकले नाहीत. ते म्हणाले की जहाज बाहेर काढणे ही जहाजाच्या मालकांची जबाबदारी आहे. तथापि, केपीटी आणि पीएसएमए पाकिस्तानच्या पाणीक्षेत्रात  कोणत्याही कार्यकारी आणि सामरिक समर्थनासाठी उपलब्ध राहतील.
 
साधारणपणे सर्व जहाजे देशाच्या पाणीक्षेत्रात प्रवेश केल्यावर पाकिस्तान ध्वज फडकवतात,परंतु एमव्ही हॅन्ग टोंग पनामा ध्वज फडकत होता, कारण आपत्कालीन परिस्थितीत बदलाचा विचार केला नसेल. टीव्हीवर या जहाजाची बातमी पाहिल्यानंतर कराचीमधील अनेक रहिवासी किनाऱ्यावर पोहोचले. परंतु, सी वेव्ह भागात लोकांना प्रवेश रोखण्यासाठी पोलिसांनी रोडब्लॉक केले  होते.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments