Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टायटॅनिक : टायटन पाणबुडी नेमकी कशी शोधली जात आहे? ऑक्सिजन संपूनही लोक वाचण्याची शक्यता किती?

Webdunia
गुरूवार, 22 जून 2023 (19:25 IST)
BBC
पाच लोकांना समुद्राच्या तळाशी घेऊन गेलेली पाणबुडी शोधण्याचं काम अजूनही सुरूच आहे. पण आता वेळ हाताबाहेर जाऊ लागलाय. आता त्यांच्याकडे फक्त थोडात ऑक्सिजन शिल्लक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
अटलांटिक महासागराच्या खोलात गेलेली पाणबुडी मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. तिला शोधण्याचं काम नेमकं कसं सुरू आहे? या कामात नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत याचा सविस्तर आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
 
ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडालं, त्याच्या आजूबाजूचं पाणी इतकं धोकादायक का आहे?
अटलांटिक महासागरात ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडालं, त्याच्या अवतीभोवतीचं क्षेत्र अत्यंत धोकादायक मानलं जातं.
 
याचं पहिलं कारण म्हणजे तिथे गडद अंधार आहे.
 
टायटॅनिक जहाज अटलांटिक महासागरात सुमारे चार किलोमीटर खोल बुडालं आहे.
 
या भागाला 'मिडनाईट झोन' म्हणतात. या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही.
 
पाणबुडीचा प्रकाश काही मीटर अंतरापर्यंतच जातो. त्यामुळे लक्ष विचलित होणं खूप सोपं आहे.
 
टायटॅनिक तज्ज्ञ टिम मॅटलिन सांगतात की, "इथे घनदाट अंधार आहे आणि पाणीही खूप थंड आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर चिखल असून तो सातत्याने हलतोय."
 
ते म्हणाले, "तुम्ही नेमके कुठे आहात हे समजण्यासाठी तुमच्याकडे केवळ सोनार सिस्टिम असते. इथे तर रडारही काम करत नाही."
 
पाच लोकांना समुद्राच्या तळाशी घेऊन गेलेली पाणबुडी शोधण्याचं काम अजूनही सुरूच आहे. पण आता वेळ हाताबाहेर जाऊ लागलाय. आता त्यांच्याकडे फक्त थोडात ऑक्सिजन शिल्लक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
अटलांटिक महासागराच्या खोलात गेलेली पाणबुडी मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. तिला शोधण्याचं काम नेमकं कसं सुरू आहे? या कामात नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत याचा सविस्तर आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
 
ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडालं, त्याच्या आजूबाजूचं पाणी इतकं धोकादायक का आहे?
अटलांटिक महासागरात ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडालं, त्याच्या अवतीभोवतीचं क्षेत्र अत्यंत धोकादायक मानलं जातं.
 
याचं पहिलं कारण म्हणजे तिथे गडद अंधार आहे.
 
टायटॅनिक जहाज अटलांटिक महासागरात सुमारे चार किलोमीटर खोल बुडालं आहे.
 
या भागाला 'मिडनाईट झोन' म्हणतात. या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही.
 
पाणबुडीचा प्रकाश काही मीटर अंतरापर्यंतच जातो. त्यामुळे लक्ष विचलित होणं खूप सोपं आहे.
 
टायटॅनिक तज्ज्ञ टिम मॅटलिन सांगतात की, "इथे घनदाट अंधार आहे आणि पाणीही खूप थंड आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर चिखल असून तो सातत्याने हलतोय."
 
ते म्हणाले, "तुम्ही नेमके कुठे आहात हे समजण्यासाठी तुमच्याकडे केवळ सोनार सिस्टिम असते. इथे तर रडारही काम करत नाही."
 
अटलांटिक महासागराचा हा भाग धोकादायक असण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्याची खोली.
 
समुद्राच्या पृष्ठभागावरील दाबाच्या तुलनेत 390 पट जास्त दाब समुद्राच्या खोलीवर असतो.
 
त्यामुळे इतक्या खोलात जायचं असेल तर पाणबुडीच्या भिंती खूप जाड असाव्यात.
 
तिसरं कारण म्हणजे येथील पाण्याचा प्रवाह.
 
वारा, लाटांमुळे इथे जोरदार प्रवाह तयार होतो. शिवाय पाण्याच्या घनतेतही फरक पडतो.
 
यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या सामानाची जागा सुद्धा बदलते.
 
टिम मॅटलिन सांगतात, "हे काहीसं मून शॉट सारखं आहे. जसं की अंतराळवीर अंतराळात जातात त्याप्रमाणे म्हणता येईल."
 
चौथे कारण म्हणजे बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष.
 
टायटॅनिक बुडून आज शंभर वर्ष झाली आहेत. त्यामुळे जहाजाचे अवशेष निखळून पडणं सुरूच आहे.
 
जर कोणी या अवशेषांच्या खूप जवळ गेलं तर त्यावर आदळण्याची, किंवा इथे हरवण्याची शक्यता असते.
 
बचाव मोहिमेचं केंद्र
टायटॅनिकचे अवशेष बघायला गेलेल्या टायटन पाणबुडीचा त्यांच्या समुद्रातील पोलर प्रिन्स या जहाजाशी संपर्क तुटला होता.
 
रविवारी एक तास 45 मिनिटांतच हा संपर्क तुटला होता. सोमवारी संध्याकाळी तज्ज्ञांनी लावलेल्या अंदाजानुसार केवळ चार दिवसांचाच ऑक्सिजन शिल्लक होता. आता तोही संपत आला आहे.
 
टायटॅनिक जहाजाचे अवशेष कॅनडातील न्यूफाउंडलँड येथील सेंट जॉन्सच्या दक्षिणेस 700 किमी अंतरावर आहेत. मात्र हे पाणबुडीचं बचावकार्य अमेरिकेतील बोस्टनमधून सुरू आहे.
 
या शोधबचाव मोहिमेत अमेरिका आणि कॅनडाच्या एजन्सीज व्यतिरिक्त, नौदल, खोल समुद्रात उतरणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांचा देखील समावेश आहे.
 
या मोहिमेत लष्करी विमानं, पाणबुड्या आणि सोनार बॉय मशीनी अशी अद्ययावत यंत्रणा पाणबुडीचा शोध घेत आहेत. बरीच खासगी जहाजंही मदतीला घेण्यात आली आहेत.
 
रिमोट पाणबुडी असलेलं डीप एनर्जी नावाचं व्यावसायिक जहाज घटनास्थळी पोहोचलं असून अटलांटिक मर्लिन टग आणि एक पुरवठा जहाज देखील तिथे पोहोचलं आहे.
 
लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) चे सागरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक अॅलिस्टर ग्रेग सांगतात की, पाणबुडीचा शोध नेमका समुद्र तळाशी घ्यायचा की समुद्राच्या पृष्ठभागावर घ्यायचं हे कोडं बचावकर्त्यांसमोर आहे. त्यामुळे शोधमोहीम राबविताना प्रत्येक वळणावर आव्हानं आहेत.
 
समुद्रतळात शोध
अमेरिकेच्या तटरक्षक दलाने म्हटलंय की, बेपत्ता पाणबुडीला टायटॅनिक जहाजाच्या अवशेषापर्यंत घेऊन जाणारं जहाज पोलर प्रिन्सने सोमवारी संध्याकाळी समुद्राच्या पृष्ठभागावरही शोध मोहीम राबवली.
 
या शोधमोहिमेसाठी सी-130 हर्क्युलिस विमानं देखील तैनात करण्यात आली आहेत. यातील दोन विमानं अमेरिकेची तर एक कॅनडाचं आहे. या विमानांनी आकाशातून समुद्राच्या पृष्ठभागावर शोध मोहीम राबवली होती.
 
अमेरिकेच्या तटरक्षक दलाने म्हटलंय की, आत्तापर्यंत जवळपास 10,000 चौरस मैल क्षेत्राचा शोध घेण्यात आला आहे.
 
ऑस्ट्रेलियन सबमरीन एस्केप अँड रेस्क्यू प्रोजेक्टचे माजी संचालक फ्रँक ओवेन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, समुद्राच्या पृष्ठभागावर पाणबुडीला अलर्ट मॅसेज पाठवता येणं शक्य होईल.
 
ते पुढे म्हणाले की, "पृष्ठभागावर आल्यावर रेडिओ ट्रान्समीटर आणि जीपीएस सिग्नल काम करतील. स्ट्रोब लाईट्स आणि रडार रिफ्लेक्टरमुळे सुरक्षा दलांना शोध घेणं सोपं होईल."
 
पण काही कारणांमुळे या पाणबुडीला संकटकालीन सिग्नल पाठवता आले नाहीत तर?
 
या प्रश्नावर प्राध्यापक ग्रेग म्हणतात, "ही पाणबुडी एका मोठ्या ट्रान्झिट व्हॅनसारखी दिसते, शिवाय तिचा रंगही सफेद असल्यामुळे आकाशातून तिचा शोध घेणं खरोखरच आव्हानात्मक आहे."
 
त्यात सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे इतरही आव्हानांचा सामना करावा लागतोय.
 
खोल समुद्रात शोधमोहीम
बचावकर्त्यांना त्यांची शोध मोहीम 4 किलोमीटरच्या खोलीपर्यंत राबवावी लागेल. कारण रेडिओ आणि जीपीएस सिग्नल पाण्याखाली जाऊ शकत नाहीत. ही पाणबुडी फक्त 6.7 मीटर लांब आहे.
 
अमेरिकेच्या तटरक्षक दलाने मंगळवारी खोल समुद्रात शोध मोहीम सुरू केल्याची माहिती दिली आहे. कॅनडाचे पी-3 अरोरा विमानही घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी सोनार बॉयच्या मदतीने परिसरात शोध मोहीम राबविली.
 
पाण्याच्या आतील गोष्टी ओळखण्यासाठी सोनार बॉयची मदत घेतली जाते. बऱ्याचदा खोल समुद्रातून येणाऱ्या शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी याचा वापर केला जातो.
 
यामुळे पाणबुडीचे प्रोपेलर आणि तिच्या मशीनमधून निघणारा आवाजही ऐकता येऊ शकतो. सोनार सिस्टीमच्या माध्यमातून पाणबुडीतील लोकांचा आवाज पृष्ठभागावरील जहाजापर्यंत पोहोचू शकतो.
 
ऑस्ट्रेलियन सबमरीन एस्केप अँड रेस्क्यू प्रोजेक्टचे माजी संचालक फ्रँक ओवेन यांनी इशारा देताना म्हटलंय की, जर पाणबुडी टायटॅनिकच्या अवशेषांच्या मधोमध असेल तर तिचा शोध घेणं खूप कठीण आहे.
 
बीबीसीशी बोलताना ते सांगतात की, "हे म्हणजे एखाद्या खाणीत सुई शोधण्यासारखं आहे. वाटेत एखादी शिळा असेल तर शोध घेणं कठीण आहे."
 
पाणबुडीमध्ये आपत्कालीन उपाय आहेत का?
ही पाणबुडी सामान्य पाणबुडीपेक्षा वेगळी आहे.
 
नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, एखादी पाणबुडी किनाऱ्यापासून स्वतंत्रपणे फिरू शकते. पण सबमर्सिबल पाणबुडीची ताकद मर्यादित असते. तिला खाली-वर जाण्यासाठी जहाजाची आवश्यकता असते.
 
मागच्या वर्षी अमेरिकन टीव्ही नेटवर्क सीबीएसचे पत्रकार डेव्हिड पग टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी ओशनगेटच्या या पाणबुडीतून समुद्रात गेले होते. त्यांनी सांगितलं की, समुद्राच्या पृष्ठभागावर परत येण्यास पाणबुडीमध्ये अनेक सुरक्षा यंत्रणा आहेत. जसं की,
 
ट्रिपल वेट्स : तीन मुख्य पाईप हायड्रोलिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणबुडी पृष्ठभागावर आणू शकतात.
 
रोल वेट्स : जर हायड्रॉलिक तंत्रज्ञानाने काम करणं बंद केलं तर पाणबुडीमध्ये बसलेले लोक पाणबुडीच्या एका टोकाला जाऊन दुसऱ्या टोकाचं वजन कमी करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने समुद्रतळाला गेलेली पाणबुडी एका बाजूने वर येऊ लागेल.
 
बॅलेस्ट बॅग: पाणबुडीच्या तळाशी धातूने भरलेल्या पिशव्या लावलेल्या असतात. मोटरच्या साहाय्याने त्या सोडल्या जातात.
 
फ्यूजिबल लिंक्स: या अशा तारा असतात ज्या बॅलेस्ट बॅगच्या सहाय्याने पाणबुडीला जोडल्या जातात. पाणबुडी सलग 16 तास पाण्याखाली राहिली आणि कोणत्याही कारणामुळे तिचे इलेक्ट्रिक आणि हायड्रॉलिक तंत्रज्ञान बिघडले तर या तारा आपोआप वितळतात आणि बॅलेस्ट बॅग पाणबुडीपासून वेगळ्या होतात.
 
थ्रस्टर्स : ही सिस्टम पाणबुडीला वरच्या दिशेने ढकलते.
 
पाणबुडीचे लेग्ज: पाणबुडीचे लेग्ज (पाय) पाणबुडीच्या मुख्य भागापासून वेगळे करून पाणबुडी तळातून वर आणली जाते.
 
एअरबॅग्ज : पाणबुडीमध्ये असलेले लोक एअरबॅग्ज फुगवून पाणबुडी तळापासून वर आणतात.
 
पाणबुडी समुद्रतळाशी असेल तर काय करावं लागेल?
अमेरिकन तटरक्षक दलाचे रिअर अॅडमिरल जॉन मॉगर सांगतात की, पाणबुडी समुद्रतळाशी असेल तर तिला बाहेर काढण्यासाठी इतर तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल. यासाठी अमेरिकन नौदल आणि काही खासगी कंपन्यांचीही मदत घेत आहोत.
 
ओशनगेटच्या मते, जगात अशा पाच सबमर्सिबल पाणबुड्या आहेत ज्या समुद्रात 12,500 फूट (3,800 मीटर) खोलीपर्यंत जाऊ शकतात, जिथे टायटॅनिकचे अवशेष आहेत. टायटन पाणबुडी त्यापैकीच एक आहे.
 
पाणबुडी तज्ज्ञ प्राध्यापक अॅलिस्टर ग्रेग म्हणतात की, टायटन पाणबुडी समुद्रतळाशी असेल आणि तिला स्वतःहून वर येता येत नसेल तर बचावकर्त्यांकडे फारच मर्यादित पर्याय शिल्लक राहिलेत.
 
ग्रेग पुढे सांगतात की, "ही पाणबुडी सुरक्षित असण्याची देखील शक्यता आहे. पण जर ती 200 मीटरपेक्षा जास्त खोल पाण्यात असेल, तर त्या खोलीपर्यंत पोहोचू शकणार्‍या काहीच पाणबुड्या आहेत. डायवर्स एवढ्या खोलीपर्यंत जाऊ शकत नाहीत. नौदलाच्या पाणबुड्यांकडेही अशी बचाव यंत्रणा नाहीये जी टायटॅनिकच्या खोलीपर्यंत पोहचू शकेल."
 
एवढ्या खोलवर बचाव कार्य करण्यासाठी तुम्हाला मानवरहित रिमोट कंट्रोल व्हेईकल (आरओव्ही) चा वापर करावा लागेल.
 
ओशियन रिकव्हरी एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ डेव्हिड मीयर्न्स म्हणतात की, “बचाव कार्यात सामील असलेल्या डीप एनर्जी केबल लेयरमध्ये आरओव्ही असून ते चालवण्याची क्षमता आहे. पण या शोध मोहिमेत कंपनीने एखादं आरओव्ही पाण्याखाली पाठवलं आहे का? याचा अंदाज नाही. किंवा मग त्यांचे आरओव्ही टायटॅनिकच्या खोलीपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहेत का? हे देखील स्पष्ट नाही.”
 
अमेरिकन नौदलाकडे असलेले आरओव्ही समुद्रात खोलवर काम करू शकतात. गेल्या वर्षी दक्षिण चीन समुद्रात कोसळलेल्या लढाऊ विमानाचे अवशेष हटवण्यासाठी त्याची मदत घेण्यात आली होती. विमानाचे अवशेष 12,400 फूट (3,780 मीटर) खोलीवर आढळले होते.
 
त्यावेळी विमानाचे अवशेष बाहेर काढण्यासाठी आरओव्हीला तारा बांधण्यात आल्या होत्या. या तारेचा हुक समुद्रातील एका क्रेनला जोडलेला होता.
 
ओशियन रिकव्हरी एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ डेव्हिड मीयर्न्स म्हणतात की, आरओव्हीच्या माध्यमातून टायटनचा शोध लावणं आणि पाणबुडी बाहेर काढणं शक्य होईल.
 
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "ट्विन मॅनिपुलेटर असलेलं रिमोट कंट्रोल व्हेईकल टायटनला हुक लाइनने जोडता येऊ शकतं. जेणेकरून तिला हळूहळू समुद्राच्या तळातून बाहेर काढता येईल."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments