Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संयुक्त राष्ट्राचा अहवाल, नोटाबंदीतून काळ्या पैश्याला आळा शक्य नाही

Webdunia
मंगळवार, 9 मे 2017 (11:38 IST)

ए कट्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशाला आळा घालता येणार नाही, असे संयुक्त राष्ट्राने एका अहवालात म्हटले आहे. काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी अधिक पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचेही संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती. नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

‘भारतीय बाजारातील काळ्या पैशांचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २० ते २५ टक्के इतके आहे. एकूण काळ्या पैशांपैकी फक्त १० टक्के काळा पैसा हा रोख रकमेच्या स्वरुपात आहे,’ असे ‘इकॉनॉमिक अँड सोशल सर्व्हे ऑफ एशिया अँड पॅसिफिक २०१७’ या अहवालात संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. ‘फक्त नोटाबंदी करुन काळ्या पैशाची निर्मिती थांबणार नाही. त्यासाठी अधिक कठोर निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने काळ्या पैशाला पूर्णपणे चाप लागणार नाही. नव्या नोटांच्या माध्यमातूनही काळ्या पैशांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे काळ्या पैशाची निर्मिती रोखण्यासाठी नोटाबंदीसोबतच इतरही उपाय करायला हवेत. अघोषित आणि बेहिशेबी मालमत्तांवर टाच आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,’ असे संयुक्त राष्ट्राने अहवालात म्हटले आहे. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments