Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विवेक रामास्वामी, भारतीय वंशाचा कोट्यधीश बनू पाहतोय अमेरिकेचा अध्यक्ष

Webdunia
रविवार, 5 मार्च 2023 (10:50 IST)
vivek Ramaswamy
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या तीन रिपब्लिकन उमेदवारांपैकी दोघेजण भारतीय वंशाचे आहेत.
या दोन उमेदवारांपैकी एक म्हणजे निकी हेली, दुसरा उमेदवार म्हणजे विवेक रामास्वामी. निकी हेली यांचं नाव यापूर्वी अनेकांच्या कानावर पडलंही असेल, पण विवेक रामास्वामींचं नाव आश्चर्याचा धक्का देणारं आहे.
 
वोक पुस्तकाचे लेखक, कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आणि उद्योजक विवेक रामास्वामींनी 21 फेब्रुवारीला फॉक्स न्यूजच्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण उतरणार असल्याचे सांगितले.
 
रामास्वामींचं म्हणणं आहे की, "नव्या अमेरिकेच्या स्वप्नासाठी एक सांस्कृतिक आंदोलन उभारायचं आहे. जर एकमेकांना जोडून घेण्यासाठी आपल्याकडे काहीच उरलं नसेल, तर विविधतेला काहीच अर्थ उरत नाही."
37 वर्षांच्या रामास्वामींचा जन्म ओहायोमध्ये झाला होता. त्यांनी हॉर्वर्ड आणि येल विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कोट्यवधींची कमाई केली. त्यानंतर त्यांनी अॅसेट मॅनेजमेंट फर्म बनवली.
 
उच्च शिक्षणाला आणखी मजबूत करणं आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचाही उल्लेख यावेळी केला.
 
भारतीय वंशाच्या नेत्यांचं समर्थन
विवेक रामास्वामींचे विचार विक्रम मंशारमणि यांच्या विचारांशी जुळतात. मंशारमणि 2022 च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिकन सिनेटसाठी हॅम्पशायरहून रिपब्लिकनचे उमेदवार होते.
 
विक्रम मंशारमणि यांनी काही दिवसांपूर्वीच विवेक रामास्वामींची भेटही घेतली होती. मंशारमणि यांच्या मते, रामास्वामी प्रचंड प्रभावशाली, विचारवंत आणि आपली बाजू योग्यपणे मांडणारे आहेत.
 
मंशारमणि म्हणतात की, रामास्वामींचा विचार अमेरिकेला वेगळं करण्याऐवजी अमेरिकेची एकजूट करणारा आहे.
"ओळखी (Identity) च्या राजकारणानं अमेरिकेत पाय पसरलं आहे आणि या प्रकारच्या राजकारणाचा परिणाम असा होतो की, एकजूट करण्याऐवजी विभागणी करण्याचं काम हे राजकारण करतं."
 
मंशारमणि यांनी काही दिवसांपूर्वी हॅम्पशायरमध्ये निकी हेली यांचंही स्वागत केलं होतं.
 
विक्रम यांच्या राजकारणाशी असमहत
मात्र, जे भारतीय रामास्वामींच्या राजकारणाशी सहमत नाहीत, ते म्हणतात की, त्यांच्या कॅम्पेनमध्ये काही खास दिसून येत नाही.
 
डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक शेखर नरसिंहन एशिया अमेरिकन्स अँड पॅसिफिक आयलँड्स म्हणजेच आपीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
 
नरसिंहन म्हणतात की, "अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाची व्यक्ती नाव कमावत आहे, याचा आनंद आहे. मात्र, रामास्वामींच्या विचारांवर काही विशेष विश्वास नाहीय."
 
"ते उद्यमशील आहेत आणि त्यांचा रेकॉर्ड स्पष्ट आहे. मात्र, ते काय आश्वासनं देत आहेत? वयोवृद्धांच्या वैद्यकीय सेवेबाबत त्यांना काळजी आहे? मूलभूत गोष्टींवर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे काय योजना आहेत? अनेक विषयांवर त्यांची मतं अद्याप समोर आलीही नाहीत," असंही शेखर सननरसिंह म्हणाले.
नरसिंहन म्हणतात की, रामास्वामी अमेरिकेला उद्देशून काहीतरी बोलू इच्छितात आणि त्यासाठीच ते राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. मात्र, ते काय बोलू इच्छितात, हे अद्याप स्पष्ट नाही.
 
नरसिंहन असंही म्हणतात की, इतर भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनीही रामास्वामींच्या भूमिकांचं नीट स्वीकार केला नाहीये.
 
'रामास्वामींना रणनीतीची गरज'
 
भारतीय वंशाच्या अनेकांनी अनेक दशकांपासून रिपब्लिक पक्षाला साथ दिलीय. मात्र, त्यातल्या कुणीच कधी रामास्वामींचं नाव ऐकलं नाहीय.
 
रिपब्लिकन पक्षाच्या समर्थक डॉ. संपत शिवांगी म्हणतात की, "मी त्यांना कधीच भेटली नाहीय. मला सांगितलं गेलं की, त्यांच्याकडे बराच पैसा आहे आणि ते चांगले बोलतात. मात्र, ते अनेक उमेदवारांपैकी एक असतील आणि त्यांना जिंकण्याची संधी फारच कमी आहे."
 
अनेकजण डॉ. संपत शिवांगींच्या मताशी सहमत दिसून येतात.
जॅनी गायकवाड यांनी जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कॅम्पेनसाठी निधी गोळा केला होता. ते म्हणतात की, "त्यांनी इतक्या लवकर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली नसती, तर क्वचितच कुणाला त्यांचं नाव कळलं असतं."
 
मात्र, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रामास्वामी घेत असलेल्या सहभागाचं ते कौतुक करतात. गायकवाड म्हणतात की, रामास्वामींना एक रणनितीची आवश्यकता आहे आणि भारतीय वंशाच्या लोकांसाठी ही रणनिती वेगळी असली पाहिजे.
 
ते पुढे म्हणतात की, आता तर सुरुवात झालीय. फ्लोरिडामधून किमान दोन ताकदवान उमेदवार मैदानात उतरणार आहेत.
 
कुणाला किती संधी?
डॅनी गायकवाड यांचा इशारा फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसँटिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे आहे. भारतीय वंशाचे लोक म्हणत आहेत की, शेवटी ही शर्यत ट्रंप, निकी हेली आणि डेसँटिस यांच्यातच होणार आहे.
 
मात्र, अजूनही स्थिती स्पष्ट होत नाहीय. कारण डोनाल्ड ट्रंप यांच्या उमेदवारीला कायद्याच्या अडचणी येऊ शकतात.
 
डॉ. शिवांगी म्हणतात की, "डोनाल्ड ट्रंप यांच्या रेटिंग्ज 40 टक्के आहे. त्यांच्या तुलनते निकी हेली यांना 10 टक्क्यांहून कमी सदस्य पसंत करतात. मात्र, त्याच उमेदवार असतील. त्यांचं भारतीय वंशाच्या असणं हेही कारण ठरू शकतं."
 
राजकीय मतभेद असूनही भारतीय वंशाच्या समूहाला याचा आनंद आहे की, अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाच्या व्यक्तींची संख्या वाढतेय. विशेषत: गेल्या तीन निवडणुकांपासून.
गायकवाड म्हणतात की, "एक चांगली गोष्ट अशी आहे की, भारतीय वंशाच्या व्यक्ती पहिल्या फळीत येताना दिसतायेत. रामास्वामींच्या उमेदवारीचं भविष्य भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करेल."
 
राजकीय विरोधकही या मताशी सहमत होतात.
डेमोक्रॅटिक पक्षाचे नरसिंहन म्हणतात की, "जर आमची मुलं कुणा रामास्वामी किंवा खन्ना किंवा कृष्णमूर्तींना निवडणूक लढताना आणि जिंकताना पाहत असतील, तर याहून चांगलं काय असू शकतं?"

Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

IND vs SA: पहिल्या T20 मध्ये नजरा अभिषेक-संजूवर, संभाव्य प्लेइंग11 जाणून घ्या

ठाण्यामध्ये लाखोंचा गुटखा जप्त, एका आरोपीला अटक

एरिगेने चेन्नई ग्रँड मास्टर्समध्ये बुद्धिबळ तिसरी फेरी जिंकली, दुसरे स्थान गाठले

ब्युटीशियनची हत्या करून तिचा मृतदेह लपवल्याच्या आरोपीला मुंबईतून अटक

सांगा धारावीमध्ये काय काम केले-नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिले आव्हान

पुढील लेख
Show comments