Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, स्मार्ट वॉच ने अपघातातून 24 वर्षीय तरुणाचे प्राण वाचवले,

Webdunia
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (12:46 IST)
एक तरुण आपल्या दुचाकीवर कुठेतरी जात होता की अचानक त्याला कारने धडक दिली आणि तो खूप दूरवर जाऊन पडला. त्याच्या मनगटावर स्मार्ट वाच होती. स्मार्टवॉच ने तो पडताच आपोआप आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि आपत्कालीन सेवेला कॉल केला
 
स्मार्ट वॉच हे जगातील सर्वाधिक विकले जाणारे प्रीमियम स्मार्ट वॉच आहे. स्मार्ट वॉचबद्दल दावा आहे, हे जगातील सर्वोत्तम स्मार्टवॉच आहे. स्मार्टवॉचच्या वैद्यकीय वैशिष्ट्यांसाठी (spo2, ECG) इत्यादींसाठी वैद्यकीय मान्यता घेते. स्मार्ट वॉचची सर्वात जास्त चर्चा एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी केली जाते आणि यावेळीहीस्मार्ट वॉचची याच कारणामुळे चर्चा होत आहे.
 
सिंगापूरमध्ये एका 24 वर्षीय माणसाचा जीव केवळ स्मार्ट वॉचमुळे वाचला. अहवालानुसार, मोहम्मद फितरी नावाचा 24 वर्षीय तरुण आपल्या दुचाकीवर कुठेतरी जात असताना अचानक त्याला कारने धडक दिली आणि तो खूप दूरवर जाऊन पडला. तो पडताच, स्मार्ट वॉचने आपोआप आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि आपत्कालीन सेवेला कॉल केला, ज्यामुळे त्या तरुणाला वेळीच मदत मिळाली आणि त्याचा जीव वाचला.
 
तरुणाने स्मार्ट वॉच 4 घातली होती. स्मार्टवॉच सीरीज 4 आणि वरील मध्ये फॉल डिटेक्शन फीचर आहे. घड्याळाला युजर पडल्याची जाणीव होताच, ती एक अलर्ट देते आणि जर आपण  तो अॅलर्ट 60 सेकंदांसाठी रद्द केला नाही तर तो इमर्जन्सी कॉल करतो. कॉल संपल्यानंतर, ते आपत्कालीन परिस्थितीसाठी सेव्ह केलेल्या क्रमांकावर लोकेशन आणि संदेश पाठवते.
 
स्मार्ट वॉचने यापूर्वी मानवांना मदत करण्याची ही पहिली वेळ नाही. यावर्षी जूनच्या सुरुवातीला, उत्तर कॅरोलिनामधील 78 वर्षीय व्यक्तीला स्मार्ट वॉचच्या फॉल डिटेक्शन फीचरने वाचवले होते. यावर्षी मे महिन्यातही एका तरुणावर  स्मार्ट वॉचच्या फॉल डिटेक्शन फीचरच्या मदतीने शस्त्रक्रिया केली.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments