Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवऱ्याला कापून पत्नीने बनवली बिर्याणी, मग तिने जे केले...

Webdunia
गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (15:40 IST)
पती-पत्नीमधील भांडण आणि नंतर घटस्फोट अशा अनेक घटना जगभरातून येत असतात. कधीकधी असे घडते की ते एकमेकांना मारतात. पण इराणमधून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. इराणची राजधानी तेहरानची ही घटना आहे. येथील इस्लामशहर नावाच्या ठिकाणी ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
मिळालेल्या वृत्तानुसार, दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. रिपोर्टनुसार, दोघांमध्ये भांडण असे होते की ते रोज एकमेकांना मारायचे. दोघांचेही फार पूर्वीच लग्न झाले असून त्यांना 5 वर्षांची मुलगीही आहे. रिपोर्टनुसार पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर होते. पत्नीला ही गोष्ट आवडली नाही तर पतीला पत्नी आवडत नसल्याने ती दररोज तिच्याशी भांडत असे. नवरा तिला आणि मुलीला रोज मारहाण करायचा. एके दिवशी अचानक दोघांमध्ये भांडण वाढले आणि नवरा चाकू घेऊन आला. त्यानंतर भांडणाच्या भरात पत्नीने चाकू हिसकावला.
 
त्यानंतर पत्नीने रागाच्या भरात पतीच्या शरीराचे तुकडे केले. इतकंच नाही तर तिची बिर्याणी बनवून ती खायला लागली. पोलिसांना याची माहिती मिळताच ते पत्नीच्या घरी पोहोचले, तेथे पतीचा अर्धवट अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. चौकशीदरम्यान महिलेने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. सध्या महिलेला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments