Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलीचे फोटो फेसबुकवर अब्रू नुकसानीचा खटला पालकांवर

Webdunia
शनिवार, 17 सप्टेंबर 2016 (11:18 IST)
कायदा सर्वासाठी समान असतो आणि त्याचा उपयोग करणे कधीही चांगले आहे. मात्र स्वतः च्या अपत्याने पालकावर हक्कभंग केला म्हणून जर खटला दाखल केला तर, हो असे झाले आहे. फेसबुकवर विनापरवानगी फोटो का टाकले ? माझी परवानगी का घेतली नाही ? असे प्रश्न निर्माण करत एका नवतरुणी १८ वर्षीय मुलीने आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई करत कोर्टात खटला दाखल केला आहे.
 
ऑस्ट्रेलिया येथील साऊथ केरोलीना येथील ही घटना आहे. या १८ वर्षीय मुलीची वकील मिशेल रामी यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिशेल रामी यांनी सांगितले की तिच्या अशिल तिची क्लाइंट असलेल्या मुलीचे २००९ पासून तिचे पालक फेसबुकवर तिचे छायाचित्र टाकत आहेत. यामध्ये ती लहान असतना, घरात छोटी असतान तोडक्या कपड्यातील फोटो आणि असे सुमारे ५०० पेक्षा अधिक असे फोटो टाकले आहेत,तर हे फोटो ७०० फेसबुकच्या मित्रांच्या फेसबुक पेजवर शेअर झाली आहेत. मुलीने त्यांना अनेकदा मागणी केली की कृपया फोटो टाकू नका मला याची बाहेर लाज वाटते,मात्र फोटो मी फोटो  काढले यावर माझा हक्क आहे असे सांगून पालकांनी फोटो टाकणे सुरूच ठेवले आहे. शेवटी मुलीने कायदेशीर सल्ला घेतला आणि पालकांवर कायदेशीर केस केली आहे.तर अब्रू नुकसानी साठी तिने आर्थिक नुकसान मिळावे असा दावाही टाकला आहे. 
 
याप्रकारचे अनेक खटले होतात मात्र पालकांनी फेसबुकवर फोटो टाकले म्हणून खटला होणारी ही जगातील पहिला घटना आहे. इतर खटल्यात सर्व वेळेस कायदेशीर कारवाई होते यात सुद्धा होईल असा विश्वास वकील मिशेल रामी यांनी  दाखवला आहे.
 
जर खटल्याचा निकाला लागला तर ती एक ऐतिहासिक घटना असेल, आणि सोशल मिडिया किती प्रकारे आपल्या आयष्यात शिरला आहे हे येथे अधोरेखित होते.

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

पुढील लेख
Show comments