Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL FINAL मध्ये चौथ्यांदा होईल CSK आणि MI चा सामना, जाणून घ्या-कोणाची बाजू आहे भक्कम

Webdunia
शनिवार, 11 मे 2019 (16:19 IST)
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) दरम्यान आयपीएल सीझन 12 चा फायनल सामना रविवारी, 12 मे रोजी हैदराबाद येथे राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाईल.
 
CSK ने IPL च्या 10 सीझनमध्ये भाग घेतला आहे आणि टीम रेकॉर्ड 8 वेळा फायनलमध्ये पोहोचली. यापैकी 3 वेळा CSK चॅम्पियन ठरली. MI टीम 5 वेळा फायनलमध्ये पोहोचून 3 वेळा शिर्षके जिंकून चुकली आहे. आयपीएलमध्ये चौथ्यांदा चेन्नई आणि मुंबई यांच्यात टक्कर होणार. आयपीएलच्या अंतिम सामन्याविषयी बोलले तर मुंबईची बाजू भारी आहे. आतापर्यंत MI 2 आणि तर CSK 1 वेळा फायनल जिंकली आहे.
 
मुंबईने पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईला पराभूत केले होते. आयपीएलच्या फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनी 9व्यांदा खेळणार. या सीझनमध्ये मुंबईने 3 वेळा चेन्नईला पराभूत केले, ज्यात 2 लीग सामने आणि 1 क्वालिफायर सामना सामील आहे. MI ने CSK विरुद्ध 2010 मध्ये आयपीएल फायनल गमावले होते, त्यावेळी सचिन तेंडुलकर संघाचा कर्णधार होता. त्यानंतर, मुंबई इंडियन्सने 2013 आणि 2015 च्या आयपीएल फायनलमध्ये चेन्नईला पराभूत केले आहे, त्या दरम्यान रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार राहिला. 
 
MI चा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक या सीझनमधील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक ठरले तर मध्यमक्रम सूर्यकुमार यादवने अनेक वेळा संघाला पुढे नेले. या सीझनमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जलद धावा बनवणे ही मुंबईच्या संघाची वेगळी विशेषता बनली आहे आणि यात हार्दिक पंड्याची देखील मोठी भूमिका राहिली आहे, ज्यात किरॉन पोलार्डचाही चांगला सपोर्ट मिळाला. गोलंदाजीत त्यांच्याकडे 2 असे गोलंदाज आहे जे डेथ ओव्हर्समध्ये धावा वाचवतात. जसप्रीत बुमरा आणि लसिथ मलिंगा यांची जोडी चेन्नईसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते.
 
CSK कडे फलंदाजीमध्ये चांगले आणि मोठी नावे आहेत. शेन वॉटसन, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू आणि कर्णधार धोनी स्वत: शानदार प्रदर्शन दाखवून चुकले आहे. गोलंदाजीसाठी हरभजनसिंग आणि इम्रान ताहिर जबाबदार असतील. बऱ्याच वेळा ब्राव्होने ट्रम्पचा इक्का असल्याचे सिद्ध केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

पुढील लेख
Show comments