Dharma Sangrah

चेन्नईचा सलग दुसरा पराभव

Webdunia
शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (12:34 IST)
महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसर्‍या   पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर 44 धावांनी मात केली. विजयासाठी दिलेले 176 धावांचे लक्ष्य चेन्नईला पूर्ण करता आले नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत सामन्यावर आपले वर्चस्व राखले होते. दिल्लीने दिलेाल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. परंतु अक्षर पटेलने वॉटसनला माघारी धाडले आणि चेन्नईच्या डावाला गळती लागली. यानंतर मुरली विजय, ऋतुराज गायकवाड ठरावीक अंतराने माघारी परतले.

यानंतर केदार जाधव आणि फाफ डू प्लेसिस यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु मधल्या षटकात अपेक्षित धावगती राखणत हे फलंदाज अपयशी ठरले. ज्यामुळे चेन्नईसमोरचे आव्हान अधिक बिकट झाले. डू प्लेसिस (43) आणि केदार जाधव (26) माघारी परतल्यानंतर धोनी (15) आणि रवींद्र जडेजा (12) यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 3, नॉर्टजेने 2 तर अक्षर पटेलने 1 बळी घेतला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

रिषभ पंतने कॅमेरासमोर दिली शिवी

T20 लीग: आयपीएल २०२६ चा ६५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे

IND vs AFG ODI Squad: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सला ७ गडी राखून पराभूत करत अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवले

CSK vs SRH:हैदराबादचा प्रभावी विजय, चेन्नई सुपर किंग्सला ५ गडी राखून पराभूत केले

पुढील लेख
Show comments