Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL 2021 Points Table: पहिल्या आठवड्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर एकमात्र अजेय टीम

Webdunia
शनिवार, 17 एप्रिल 2021 (10:48 IST)
आयपीएल 2021 सुरू होऊन आठवडा झाला आहे. 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)  आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झालेल्या सामन्यासह या स्पर्धेच्या या मोसमाची सुरुवात झाली आणि यावेळी सर्व संघांनी दोन सामने खेळले आहेत.
 
विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने मुंबईला पराभूत करून स्पर्धेस विजयी सुरुवात केली आणि पहिल्या आठवड्याच्या शेवटी, आयपीएलच्या या मोसमातील हा संघ एकमेव अजेय संघ आहे. आरसीबी वगळता इतर सर्व संघांनी किमान एक सामना गमावला आहे. सनरायझर्स हैदराबाद हा एक असा संघ आहे जो अद्यापपर्यंत एकाही सामना जिंकू शकलेला नाही.
 
IPL Points Table: आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले गेले आहेत आणि त्या आधारे आरसीबी पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. त्याचबरोबर, एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जला 6 विकेट्सने हरवून 8 व्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर पंजाब तिसऱ्या स्थानावरून सातव्या स्थानावर आहे. रोहित शर्माची मुंबई तिसर्याा, दिल्ली चौथ्या, राजस्थान रॉयल्स पाचव्या आणि कोलकाता नाइट रायडर्स सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद सर्वात खालच्या स्थानी आहे.
 
IPL Purple Cap:  आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 8 सामन्यांच्या आधारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या हर्षल पटेलने सध्या पर्पल कॅप ताब्यात घेतला आहे. पटेलने दोन सामन्यांत सात गडी बाद केले आहेत. या यादीत कोलकाता नाइट रायडर्सचा आंद्रे रसेल दुसर्या  स्थानावर 6 विकेट्ससह आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटलच्या आवेश खानने तिसऱ्या क्रमांकावर 5 बळी मिळवले.
 
IPL Oragne Cap:  आयपीएलच्या 14 व्या मोसमात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांच्या आधारे ऑरेंज कॅपवर सध्या कोलकाता नाइट रायडर्सच्या नितीश राणाचा कब्जा आहे. नितीशने आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये 137 धावा केल्या असून या यादीत अव्वल स्थान आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन १२3 धावांसह दुसर्याआ क्रमांकावर आहे. या यादीमध्ये सनरायझर्स हैदराबादचा मनीष पांडे 99 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments