Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

RCB vs SRH ipl 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा लाजिरवाणा पराभव, हैदराबादने केवळ 8 षटकांत 69 धावांचे लक्ष्य गाठले

RCB vs SRH ipl 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा लाजिरवाणा पराभव, हैदराबादने केवळ 8 षटकांत 69 धावांचे लक्ष्य गाठले
, शनिवार, 23 एप्रिल 2022 (22:17 IST)
rcb vs srh live score ipl 2022:  शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा संघ 16.1 षटकांत 10 विकेट्स गमावून 68 धावांवर गारद झाला. आयपीएलमधील संघाची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 2107 मध्ये कोलकाता विरुद्ध संघ 49 धावांत गारद झाला होता. 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने 8 षटकांत 72 धावा केल्या आणि सामना 9 विकेटने जिंकला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 47 धावा केल्या. 
 
बंगळुरूची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकातच संघाने आपले तीन विकेट गमावले. अनुज रावत आणि विराट कोहली खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. फॅफ 5 धावा करून बाद झाला. मार्को जेन्सनने एकाच षटकात या तिन्ही विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेल 11 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. प्रभुदेसाई 15, शाहबाज 7 धावा करून बाद. दिनेश कार्ती खाते न उघडता 3 चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. हर्षलने 4 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून मार्को आणि नटराजन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. 
 
बंगळुरू संघाचे 8 सामन्यांतून 5 विजयांसह 10 गुण आहेत आणि ते या सामन्यातील पराभवानंतर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहे, तर हैदराबाद 7 सामन्यांतून 5 विजय आणि 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राणा दाम्पत्याची रात्र पोलीस ठाण्यात जाणार