Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हैदराबाद सलग पाचव्या विजयानंतर गुणतालिकेत दुसऱ्या, ऑरेंज कॅप शर्यतीत हार्दिकने राहुलला मागे टाकले

हैदराबाद सलग पाचव्या विजयानंतर गुणतालिकेत दुसऱ्या, ऑरेंज कॅप शर्यतीत हार्दिकने राहुलला मागे टाकले
, मंगळवार, 26 एप्रिल 2022 (13:43 IST)
आयपीएल2022 चा अर्धा हंगाम संपला आहे. सर्व संघांनी 14 पैकी किमान सात सामने खेळले आहेत. कोलकाता आणि बंगळुरू संघ आठ सामने खेळले आहेत. गुजरातचा संघ सातपैकी सहा सामने जिंकून पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, सलग पाच सामने जिंकून हैदराबाद दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. कोलकातासाठी प्लेऑफचा मार्ग खूपच कठीण झाला आहे. शुक्रवारी पहिल्या स्थानावर पोहोचलेला राजस्थान आता तिसऱ्या स्थानावर घसरला असला तरी प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनण्याच्या शर्यतीत बेंगळुरू आणि लखनौ पुढे आहेत. 
 
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत लोकेश राहुलला मागे टाकले आहे. मात्र, जोश बटलर अव्वल स्थानावर कायम आहे आणि त्याला मागे टाकणे कोणत्याही फलंदाजासाठी खूप कठीण असेल. युझवेंद्र चहल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे आणि त्याने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नटराजनपेक्षा तीन बळी घेतले आहेत. 
 
गुणपत्रिका स्थिती
पहिले दोन सामने मोठ्या फरकाने गमावलेल्या हैदराबादने सलग पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर गुजरातने कोलकात्याला हरवून 12 गुण मिळवत पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे. राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या पराभवानंतर बंगळुरू चौथ्या स्थानावर कायम आहे. लखनौचा संघ पाचव्या स्थानावर असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दिल्ली सहाव्या, कोलकाता सातव्या आणि पंजाब आठव्या स्थानावर आहे. या संघांसाठी प्लेऑफचा रस्ता खूपच कठीण झाला आहे. 
 
मुंबईचा संघ शेवटचा तर चेन्नई नवव्या क्रमांकावर असल्याने दोन्ही संघांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नगण्य आहे. चेन्नईला त्यांचे सर्व सामने जिंकून स्पर्धेतील सुरुवातीच्या चार संघांमध्ये स्थान मिळवता आले असले तरी मुंबईलाही ते शक्य नाही. 
 
राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, लोकेश राहुलला मागे टाकत हार्दिक पांड्या दुसऱ्या स्थानावर आहे. हार्दिकने सहा सामन्यांत 295 धावा केल्या आहेत. 
 
पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहल आघाडीवर आहे. त्याने सात सामन्यांत 18 बळी घेतले आहेत. तर कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर आणि ड्वेन ब्राव्हो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाची झडप, अपघातात 5 ठार