IPL 2023: 'कॅप्टन कुल'च्या आयपीएलमधील 5,000 धावा अन् पुनरागमनाचा सोहळा

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 8 January 2025
webdunia

IPL 2023: 'कॅप्टन कुल'च्या आयपीएलमधील 5,000 धावा अन् पुनरागमनाचा सोहळा

dhoni
, मंगळवार, 4 एप्रिल 2023 (09:06 IST)
आयपीएल स्पर्धेतले काही ऋणानुबंध विलक्षण असे आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंग धोनी हे असेच समीकरण. आयपीएल सुरू झालं तेव्हापासून धोनी चेन्नईच्या संघात आहे.
 
धोनीच्याच नेतृत्वात चेन्नईने आयपीएलची जेतेपदं नावावर केली आहेत. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने सातत्याने जिंकण्याचे असंख्य विक्रम नावावर केले आहेत.
 
चेन्नई सुपर किंग्स म्हणजे धोनी आणि धोनी म्हणजे चेन्नई सुपर किंग्स असे जणू समानार्थी शब्दच झाले. सोमवारी आयपीएल स्पर्धेतल्या चेन्नई-लखनौ लढतीच्या निमित्ताने 1426 दिवसांनंतर धोनीची किमया अनुभवता आली. धोनीच्या चतुर नेतृत्वाच्या बळावर चेन्नईने ही लढत 12 धावांनी जिंकली.
 
चेन्नईकर चाहत्यांची क्रिकेटची समज उत्तम. युवा खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांची मोट बांधत धोनीनेच सुरेख संघ बांधला. धोनीने या संघाला जिंकण्याची सवय लावली.
 
निकालाइतकंच प्रोसेसचं महत्त्व धोनीने ठसवलं. सामना जिंकण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करणं आवश्यक आहे. भले मग निकाल आपल्या बाजूने नाही लागला तर निराश होऊ नका ही शिकवण धोनीने बिंबवली.
 
धोनीच्या या दृष्टिकोनाला चेन्नईच्या चाहत्यांनी पाठिंबा दिला. चेन्नईच्या सामन्यांना चेपॉक अर्थात एम.ए.चिदंबरम स्टेडियम भरगच्च असे. एकप्रकारे धोनी, रैना आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ शहराच्या संस्कृतीत बेमालूमपणे मिसळून गेलं.
 
सोमवारी नाणेफेकीसाठी धोनी खेळपट्टीवर आला तेव्हा धोनी धोनीच्या गजरांनी मैदान निनादलं. समालोचक इयान बिशप धोनीला प्रश्न विचारण्याआधी थांबले. संध्याकाळच्या कातरवेळीही चेन्नईकरांनी धोनी धोनीच्या गर्जनेत मैदान डोक्यावर घेतलं.
 
नाणेफेकीनंतर धोनीला पाहण्यासाठी चेन्नईकरांना 20 षटकं वाट पाहावी लागली. डावातल्या शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजा बाद झाला आणि महेंद्रसिंग धोनीच्या नावाने चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
 
चाळिशीत पोहोचूनही फिट असलेला धोनी वेगाने खेळपट्टीपर्यंत पोहोचला. प्रक्षेपणकर्त्या कंपनीने कॅमेरा मैदानभर फिरवला. धोनीच्या पुनरागमनाचं स्वागत करणारे पोस्टर्स विहरत होते. अख्ख्या मैदानाला सूर्यफुलाचं रुप प्राप्त झालं होतं.
 
धोनीच्या कारकीर्दीतील विविध क्षणांचा आढावा घेणारे फोटो सगळीकडे दिसत होते. चाहत्यांनी मोबाईलचे लाईट सुरू केले आणि धोनीला प्रकाशी मानवंदना दिली.
 
मैदानातल्या वादळी पाठिंब्यातही धोनीच्या चेहऱ्यावरचे शांत भाव कायम होते. पहिल्या लढतीत पाच विकेट्स पटकावणाऱ्या तेजतर्रार मार्क वूडच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीने थर्डमॅनच्या दिशेने षटकार खेचला आणि मैदानात धोनी धोनी नामाला उधाण आलं.
 
उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूला स्लाईस करत धोनीने चेंडूला मैदानाबाहेर पाठवलं.
 
मार्क वूडने तिसरा चेंडू उसळता टाकला. उजव्या यष्टीबाहेरच्या डोक्याच्याही वर उसळलेला चेंडूला धोनीने तसंच प्रत्युत्तर दिलं. धोनीने तो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने स्टेडियममध्ये भिरकावून दिला.
 
या फटक्याने धोनीचे सहकारीही वेडे झाले. चेन्नईच्या ड्रेसिंगरुममधल्या प्रत्येकाने उभं राहून धोनीच्या या फटक्याला मानवंदना दिली.
 
धोनीच्या दोन षटकारांमुळे चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतलं. षटकारांची हॅट्ट्रिक करण्यासाठी आतूर धोनीने उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू फटकावला. पण चेंडूने बॅटच्या तळाची कड घेतली आणि तो डीप पॉइंटला उभ्या असलेल्या रवी बिश्नोईच्या हातात जाऊन विसावला.
 
बिश्नोईने तो झेल घेताच मैदानात क्षणिक शांतता पसरली. पुढच्याच मिनिटाला पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या धोनीसाठी चाहते उभे राहिले.
 
अवघ्या पाच मिनिटात धोनीच्या महतीची अनुभूती जगभरातल्या चाहत्यांना अनुभवायला मिळाली. छोट्या खेळीदरम्यान धोनीने आयपीएल स्पर्धेत 5000 धावांचा टप्पा ओलांडला.
 
ऋतुराजच्या षटकाराने गाडीला आला पोचा
चेंडूच्या ठिकऱ्या उडवण्याऐवजी चेंडूला अलगदपणे फटकावत चौकार-षटकार वसूल करण्याची अनोखी शैली ऋतुराज गायकवाडकडे आहे.
 
सलामीच्या लढतीतला फॉर्म कायम राखत ऋतुराजने पहिल्यांदाच चेन्नईच्या घरच्या मैदानावर खेळताना 31 चेंडूत 57 धावांची स्फोटक खेळी केली.
 
मालिकावीराला एक गाडी बक्षीस म्हणून मिळणार आहे. ऋतुराजच्या एका षटकाराने मैदानात उभ्या त्या गाडीला पोचा आला.
 
डेव्हॉन कॉनवे- ऋतुराज जोडीने 110 धावांची खणखणीत सलामी दिली. कॉनवेसाठीही चेन्नईत खेळण्याची ही पहिलीच वेळ. त्यानेही आवाजी पाठिंब्याला दाद देत 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली.
 
तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने 16 चेंडूत 27 धावांची खेळी केली. मोईन अली या सामन्यातही मोठी खेळी करु शकले नाहीत. 16.25 कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलेला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स या लढतीतही कमाल दाखवू शकला नाही.
 
अंबाती रायुडूने 14 चेंडूत नाबाद 27 धावा केल्याने चेन्नईला मोठी धावसंख्या गाठता आली. चेन्नईने 217 धावांचा डोंगर उभारला. लखनौतर्फे मार्क वूड आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
 
कुत्र्यामुळे झाला उशीर
पावसामुळे सामना उशिरा सुरू झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल पण सोमवारी चेन्नईत चेपॉक स्टेडियमवर चक्क एका कुत्र्यामुळे उशीर झाला.
 
नाणेफेकीनंतर दोन्ही संघ मैदानात उतरले. खेळायला सुरुवात होणार तोच एक कुत्रा मैदानात घुसला. सुरक्षारक्षकांची फौज कुत्र्यामागे धावत निघाली. कुत्र्याचा वेग त्यांना भारी पडला. या दृश्याने चेन्नईच्या खेळाडूंना हसू आवरेना.
 
चाहत्यांनाही ही धमाल अनुभवायला मिळाली. अखेर कडं करुन सुरक्षारक्षकांनी या कुत्र्याला रोखलं आणि मैदानाबाहेर घेऊन गेले.
 
मायर्सची धडाकेबाज सुरुवात
काईल मायर्सने लखनौला खणखणीत सुरुवात करुन दिली. मायर्सने 22 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची अफलातून खेळी केली.
 
सहाव्या षटकात बिनबाद 79 अशी लखनौची मजबूत स्थिती होती. पण मोईन अलीने मायर्सला बाद करत जोडी फोडली. मिचेल सँटनरने दीपक हुड्डाला चकवलं.
 
कृणाल पंड्याही मोईन अलीने झटपट माघारी धाडलं. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या राहुलचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न ऋतुराजच्या हातात जाऊन विसावला. मार्कस स्टॉइनस आणि निकोलस पूरनने धावफलक हलता ठेवला. मोईन अलीने स्टॉइनसला त्रिफळाचीत केलं. त्याने 21 धावा केल्या.
 
पूरनने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत चौकार-षटकारांची लयलूट करायसा सुरुवात केली. पण 16व्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सने पूरनचा अफलातून झेल घेतला. त्याने 18 चेंडूत 32 धावांची खेळी केली.
 
अयुश बदोनी आणि कृष्णप्पा गौतम यांनी अवघड आव्हान पेलण्यासाठी प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले. वाईड यॉर्करची रणनीती अवलंबत धोनीने विजयाचा मार्ग सुकर केला.
 
सामना संपताना, धोनीने अयुश बदोनीने उंच लगावलेला फटका टिपत मैफलीचा शेवटही किमयागार केला. लखनौने 205 धावा केल्या. चेन्नईतर्फे मोईन अलीने 4 तर तुषार देशपांडेने 2 विकेट्स पटकावल्या.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गिरीश बापटांच्या निधनाला आठवडा होत नाही, तोच पोटनिवडणुकीची चर्चा का?