आयपीएलचा 17वा हंगाम शिगेला पोहोचला आहे. रविवारी या मोसमातील शेवटचा दुहेरी हेडर असेल. पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबाद विरुद्ध पंजाब सामन्यापूर्वी पंजाब किंग्जच्या संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यात शिखर धवन आणि सॅम कुरन नव्हे तर जितेश शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.
पंजाब किंग्ससाठी हा हंगाम काही खास राहिला नाही. 13 सामन्यांत आठ पराभवांसह हा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. संघाच्या खात्यात 10 गुण आहेत. पंजाब 19 मे रोजी साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबादने आधीच प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे.
पंजाब किंग्सने एक मोठा निर्णय घेत जितेश शर्माकडे कर्णधारपद सोपवले आहे. वास्तविक, शिखर धवन जखमी झाल्यानंतर सॅम कुरन संघाचे नेतृत्व करताना दिसला. मात्र, तो आता इंग्लंडला परतला आहे. अशा स्थितीत यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा आता या मोसमात तिसरा कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
आयपीएलचा हा सीझन जितेशसाठी काही खास नव्हता . 13 सामन्यांत त्याने 122.05 च्या स्ट्राईक रेटने केवळ 155 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याने आपल्या बॅटने एकही अर्धशतक झळकावलेले नाही.