Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कृणाल पांड्या दुसऱ्यांदा बाबा झाला, पत्नी ने दिला गोंडस मुलाला जन्म

Webdunia
शनिवार, 27 एप्रिल 2024 (16:07 IST)
आयपीएलमध्ये बॉल आणि बॅटने खळबळ माजवणारा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला मोठी बातमी मिळाली आहे. कृणाल पांड्या दुसऱ्यांदा वडील झाला आहे. खुद्द कृणाल पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्मा हिने 21 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला आहे.
 
कृणाल आणि पंखुरी दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. कृणाल पांड्याने आपल्या लहान मुलाचे नाव वायु असे ठेवले आहे. वायू कृणाल पांड्या सोशल मीडियावर लिहिताना त्याने आपल्या मुलाची जन्मतारीख म्हणजेच 21 एप्रिल 2024 लिहिली. कृणाल पांड्याचे चाहते सोशल मीडियावर सतत अभिनंदन करत आहेत.
 
कृणाल पांड्या आणि पंखुरी शर्मा यांचे लग्न 2017 मध्ये झाले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर कृणाल आणि पंखुरी शर्माने लग्न केले. लग्नाच्या 5 वर्षानंतर कृणाल पांड्याला कबीर पंड्या नावाचा मुलगा झाला. कृणाल पंड्याचा धाकटा भाऊ म्हणजेच हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे.लखनौ संघाला कृणाल पांड्याकडून खूप आशा आहेत.

Edited By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

पुढील लेख
Show comments