Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंटरनेटशिवाय स्मार्टफोनवर फ्रीमध्ये टीव्ही

Webdunia
सोमवार, 27 एप्रिल 2015 (11:17 IST)
आता आपल्या स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय फ्रीमध्ये टीव्ही पाहता येणार आहे. विश्वास बसत नाहीये ना! मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात काहीही अशक्य नाही.

देशात पब्लिक ब्रॉडकास्टर प्रसार भारती लवकरच देशातील लोकांना स्मार्टफोनवर टीव्ही चॅनेल दाखविण्याचा एक पायलट प्रोजेक्टवर काम करत आहेत. यामुळं टीव्ही चॅनेल पाहायला आपल्याला इंटरनेट कनेक्शनची गरज नसेल. प्रसार भारतीचे सीईओ जवाहर सिरकार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ‘जेव्हा जग टेरेस्टेरियलकडून सॅटेलाइटकडे जात आहे. तर मग दूरदर्शननं मागे का राहावं. आता पुढे जाण्याचा एकच मार्ग नव्या टेक्नॉलॉजीसोबत उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करणं.’

या प्रोजेक्टच्या सुरुवातीला प्रसार भारती जवळपास 20 फ्री टू एअर चॅनेल्सचं पॅक तयार करत आहे. या पॅकमध्ये डीडीचे सर्व टॉप चॅनेल्स शिवाय मोठे प्रायव्हेट ब्रॉडकास्टर्सचे लोकप्रिय फ्री-टु-एअर चॅनेल्सचा समावेश असेल. प्रसार भारती या प्रोजेक्टद्वारे जे लोक स्मार्टफोनवर जास्तीत जास्त वेळ घालवतात, त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

जवाहर सिरकार पुढे म्हणाले, या योजनेंतर्गत प्रेक्षक एका डिव्हाईसद्वारे आपला स्मार्टफोन, टॅबलेटवर फ्री चॅनेल्स पाहू शकतील. या डिव्हाईसमध्ये सॅमसंग, अँपल, मायक्रोसॉफ्ट आणि एचसीएल सारख्या हार्डवेअर मॅन्युफॅक्चर्स आपल्या सिस्टिममध्ये इनबिल्ट करू शकतात. प्रसार भारतीनं या योजनेबद्दल माहिती व प्रसारण मंत्रालयाला सूचित केलंय.

या प्रोजेक्ट अंतर्गत प्रेक्षकाला जवळपास 20 टीव्ही चॅनेल्स आणि 20 रेडिओ चॅनेल्स मिळतील. ते फ्री टू एअर आणि फ्री फॉर लाईफ असतील. यासाठी कोणत्याही डिश, इंटरनेट आणि सेट-टॉप बॉक्सची गरज नसेल.

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Show comments