Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेसबुकवर 10 करोड नकली अकाउंटस्?

Webdunia
मंगळवार, 6 मे 2014 (16:27 IST)
सोशल नेटवर्किग वेबसाईट फेसबुकनं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, या पोर्टलवर 10 करोडपेक्षा जास्त नकली (डुप्लिकेट) अकाउंटस् असण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे यातले बहुतेक अकाउंट भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये अधिक आहेत. कंपनीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार जगभरात या पोर्टलवर 50 लाख ते 1.5 करोड किंवा त्यापेक्षा जास्तही अकाउंट रजिस्टर आहेत. फेसबुकनं एसईसीला ही सूचना दिलीय. यानुसार, या पोर्टलवर असेही लोक आहेत ज्यांनी पोर्टलच्या काही नियमांचं उल्लंघन करत फेसबुकवर एकपेक्षा जास्त अकाउंटस् बनवले आहेत.

उदाहरण द्यायचंच झालं तर 2013 मध्ये जगभरात महिन्यातील सक्रिय उपभोगकर्त्यांच्या (एमएयू) नकली अकाउंटस्ची संख्या 4.3 टक्क्यांहून 7.9 टक्क्यांवर पोहोचल्याची शक्यता आहे. नकली किंवा डुप्लिकेट फेसबुक अकाउंट म्हणजे एखाद्या उपभोगकर्त्यांन आपल्या मुख्य प्रोफाईलसोबतच इतर प्रोफाईल बनवून ठेवलेल्या आहेत. फेसबुकच्या नवीन मासिक रिपोर्टनुसार, अशा नकली अकाउंटस्ची संख्या भारत आणि तुर्कीसारख्या विकासनशील देशांत अधिक आहे. यानुसार, 31 मार्च 2014 पर्यंत फेसबुकचे 1.28 अरब एमएयू होते. हीच संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी अधिक आहे. तसंच पहिल्या तिमाही (2014)त यामध्ये भारत आणि ब्राझीलच्या उपभोगकर्त्यांचा अधिक सहभाग होता.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments