Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Google Searchमधून जास्तीत जास्त योग्य माहिती मिळवण्यासाठीच्या 8 सोप्या ट्रिक्स

Webdunia
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (12:03 IST)
गुगलच्या अनेक सेवा आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. त्यातही गुगल सर्च हा कायम हाताशी असणारा हक्काचा पर्याय. या सर्चमध्ये अधिकाधिक योग्य रिझल्ट मिळवण्यासाठी काय करायचं?
 
गुगलवर एखादी माहिती शोधताना काही सोप्या गोष्टी केल्या तर आपल्याला सर्च रिझल्ट अधिक योग्य मिळतील आणि नेमकी माहिती कमीत कमी वेळात शोधता येईल.
 
1. अवतरण चिन्हांचा वापर (Quotation Marks)
जर तुम्ही एखादं वाक्य अवतरण चिन्हांमध्ये - " " घालून शोधलंत तर गुगल तुम्हाला हवी असलेली माहिती अगदी त्याच क्रमानुसार शोधेल.
 
यामुळे तुमच्या वाक्यातले काहीच शब्द असणारे रिझल्टस वगळले जातील.
उदा. जर तुम्ही "Weather in Maharashtra" असं शोधलंत तर तुम्हाला गुगल तेच रिझल्ट्स दाखवेल ज्यामध्ये या शब्दांचा, याच क्रमाने वापर करण्यात आला आहे.
 
फक्त Weather किंवा फक्त Maharashtra असं असणारे सर्च रिझल्ट्स तुम्हाला दाखवले जाणार नाहीत.
 
2. माहिती वगळण्यासाठी डॅशचा (-) वापर
एखाद्या शब्दाच्या आधी जर तुम्ही डॅश किंवा वजाबाकीचं चिन्हं लिहीलं तर गुगल तो शब्द सर्चमधून वगळून इतर गोष्टी सर्च करतं.
 
म्हणजे तुम्हाला आरोग्यविषयक बातम्या वाचायच्या असतील पण कोरोना व्हायरसविषयीच्या बातम्या वाचायच्या नसतील तर काय करायचं?
 
सोपं आहे. सर्च करताना Health -coronavirus असं टाईप केलं तर कोरोना व्हायरस वगळून आरोग्यविषयक इतर माहिती येईल.
 
पण हे करताना त्या शब्दाला चिकटून आधी डॅश किंवा हायफनचं चिन्हं वापरावं. डॅश आणि शब्द यात स्पेस नको.
3. कालावधी दाखवण्यासाठी टिंबाचा (..) वापर
एखाद्या ठराविक कालावधीमधली माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.
 
म्हणजे तुम्हाला 2008 ते 2012 या काळात रीलिज झालेल्या जेम्स बाँड सिनेमांची यादी हवी असेल, तर तसं संपूर्ण वाक्य लिहिण्याऐवजी James Bond 2008..2012 असं सर्च करा.
 
किंमतीबाबतही तुम्ही हे करू शकता. म्हणजे 20 ते 30 हजार रुपये किंमत असणारा लॅपटॉप तुम्हाला शोधायचा असेल तर Rs.20,000..30,000 Laptop असं सर्च करा.
 
4. फक्त तुम्हाला हव्या त्या वेबसाईट्सवरची माहिती सर्च करा
एखाद्या सर्च टर्मच्या (सर्च करतोय त्या शब्दाच्या) आधी वा नंतर एखादी विशिष्ट वेबसाईट लिहील्यास गुगल तुम्हाला त्या वेबसाईटवरच्या माहितीचे सर्च रिझल्ट दाखवेल.
5. एखाद्या ठराविक जागेविषयीची माहिती
गुगलवर तुम्हाला एखाद्या ठराविक जागेविषयीची माहिती मिळवण्यासाठीही सर्च करता येईल.
 
असं करण्यासाठी Location हा शब्द वापरा.
 
पाऊस लोकेशन : मराठवाडा bbc.com/marathi असं सर्च केल्यास तुम्हाला बीबीसी मराठीवरच्या मराठवाड्यातल्या पावसाविषयीच्या बातम्या मिळतील.
 
एखाद्या विशिष्ट वेबसाईटवर सर्च करायचं नसल्यास तुम्ही फक्त सर्च करायची गोष्ट आणि त्यापुढे लोकेशन लिहून माहिती शोधू शकता.
 
6. दोन गोष्टी एकावेळी शोधण्यासाठी | चा वापर
एकमेकांशी संबंध नसलेल्या दोन गोष्टी तुम्ही एकाचवेळी शोधू शकता.
 
या दोन शब्दांच्या मध्ये | घातल्यास त्याचा वापर or सारखा होतो आणि आणि गुगल तुम्हाला या दोन शब्दांविषयीचे रिझल्ट्स दाखवले.
7. एखाद्या कंपनीची शेअर बाजारातली माहिती.
जर तुम्हाला शेअर बाजारात रस असेल किंवा मग तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स घेतले आहेत, त्याच्या किंमतींवर लक्ष ठेवायचं असेल तर मग गुगलला साधी सूचना देऊन तुम्ही ही माहिती मिळवू शकता.
 
stock : असं लिहून तुम्ही तुम्हाला हव्या त्या कंपनीचं नाव समोर लिहा.
 
त्या कंपनीची कामगिरी तुम्हाला गुगल दाखवेल.
 
8. फाईलच्या फॉरमॅटनुसार सर्च करा.
एखाद्या विशिष्ट वेबसाईटवरची माहिती सर्च न करता जर ती तुम्हाला एखाद्या विशिष्ट फॉरमॅटमध्ये शोधायची असेल, तर तुम्ही तसं करू शकता.
 
असं करण्यासाठी सर्च टर्मच्या पुढे filetype : असं लिहून शोधा.
 
वर्ड फाईलसाठी doc किंवा पीडीएफसाठी pdf असं तुम्ही लिहू शकता.
 
उदा. नवरात्र नियमावली filetype : jpeg

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार 'मोठा निर्णय'? एकनाथ शिंदे यांच्या अचानक सातारा दौऱ्याचे कारण आले समोर

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

पुढील लेख
Show comments