Festival Posters

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 2 जुलै 2021 (11:41 IST)
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा कंपनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून करण्यात आली आहे. हा गेम 2 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता भारतात लाँच झाला आहे. हा PUBG Mobile चा इंडियन वर्जन गेम आहे. गेम प्री-रजिस्टर्ड यूजर्सला आधीपासूनच डाउनलोडसाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता. आता Battlegrounds Mobile India गेमचे डेवलपर्स krafton ने Battlgrounds Mobile India च्या ऑफिशियल वर्जनच्या डाउनलोडिंगची घोषणा केली आहे.
 
गेम संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Google Play Store वरून गेमर्स ते डाउनलोड करण्यात सक्षम असतील. दुसरीकडे, ज्या वापरकर्त्यांनी अर्ली अॅक्सेससाठी गेम डाउनलोड केला आहे त्यांना फक्त Google Play Store वरून गेम अपडेट करावा लागेल.
 
Battlegrounds Mobile India केवळ Android स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, iOS आधारित ऑपरेटिंग सिस्टमसह डिव्हाइसला गेमसाठी थोडं थांबावं लागेल.
 
क्राफ्टनने हे स्पष्ट केले आहे की थर्ड पार्टी स्टोअर किंवा एपीके फाइलच्या मदतीने गेम डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.
 
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम खेळणार्‍या वापरकर्त्यांना 19 ऑगस्टपर्यंत रिवार्ड प्वाइंट मिळतील. गेमच्या लॉन्चिंग सेलिब्रेशन ऑफरचा एक भाग म्हणून Krafton ने इन-गेम इवेंटची घोषणा केली असून, गेम खेळून रीडीम करता येईल.
 
Battlegrounds Mobile India ला मोबाइल ओटीपीच्या सहाय्याने लॉग इन करता येईल.
 
कंपनीच्या म्हणण्यानुसार, BGMI गेम खेळणार्‍या कोणत्याही वापरकर्त्याचा डेटा संग्रहित केला जाणार नाही.
 
Battleground Mobile India गेम काही बदलांसह PUBG Mobile सारखा सादर करण्यात आला आहे. खेळाच्या पात्रातील पोशाख बदलला आहे. सोबतच ग्रीन ब्लडसह प्रस्तुत करण्यात आला आहे.
 
भारत सरकारने मागील वर्षी भारतात PUBG Mobile वर बंदी घातली होती. भारताची सुरक्षा, एकता आणि अखंडतेचा हवाला देत सरकारने चिनी अ‍ॅप तसेच PUBG वर बंदी घातली होती. तेव्हापासून, पब्जी मोबाइल भारतात पुनरागमन करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईची मतदार यादी वादग्रस्त म्हणत विरोधकांनी केला हल्लबोल

अमरावतीच्या तिवासा तहसीलमधील शिवणगाव-बेनोडा भागात भूकंपाचे धक्के जाणवले

पटणामध्ये तिहेरी हत्याकांड; व्यापाऱ्याची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना लोकांनी बेदम मारहाण करून केले ठार

हवामान पुन्हा बदलेल? चक्रीवादळाचा धोका; या राज्यांमध्ये आयएमडीचा इशारा

पाकिस्तानमध्ये मुलांनी रॉकेटला खेळणे समजून उचलले, स्फोट होताच तीन जण ठार

पुढील लेख
Show comments