Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Google Birthday: गुगलचा आज 25 वा वाढदिवस नवीन डूडलद्वारे साजरा

Webdunia
बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (11:45 IST)
Google's 25th birthday: सध्या इंटरनेटचे युग आहे. इंटरनेटमुळे आपण जगाच्या पाठीवर कुठे ही जाऊ शकतो .काहीही माहिती मिळवायची असेल तर आपण गुगलचा वापर सर्रास करतो. गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गुगलचा आज म्हणजे 27 सप्टेंबर 2023रोजी 25 वा वाढदिवस आहे.गुगलचा वाढदिवस गुगलने डुडल द्वारे साजरा केला आहे.  
 
90 च्या दशकाच्या उत्तरार्धात, दोन समविचारी डॉक्टरेट विद्यार्थी स्टॅनफोर्ड विद्यापीठात कम्प्युटर सायन्सची पदवी घेत असताना एकमेकांना भेटले. त्यांचे नाव सर्गे ब्रिन आणि लॅरी पेज होते , ज्यांना वर्ल्ड वाइड वेब अधिक सोपे आणि चांगले बनवायचे होते.त्यांनी सर्च इंजिन तयार करण्यास सुरुवात केली. 
 
त्यांच्या वसतिगृहाच्या खोलीत, दोन्ही विद्यार्थ्यांनी नवीन आणि सुधारित शोध इंजिनच्या प्रोटोटाइपवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी भाड्याच्या गॅरेजमध्ये त्यांचे पहिले कार्यालय सुरू केले आणि 27 सप्टेंबर 1998 रोजी Google Inc. चा जन्म झाला.

गुगल हा शब्द खरंतर ‘Googol’ या शब्दाचं बदललेलं रुप आहे. एकावर शंभर शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होते, तिला गुगोल म्हणतात. यापासूनच गुगलचं नाव देण्यात आले आहे.
 
या 25 वर्षांत गुगलने अनेक छोटे-मोठे बदल पाहिले आहेत. एका छोट्या गॅरेजपासून सुरू झालेल्या या कंपनीची आज जगातील टॉप टेक कंपन्यांमध्ये गणना होते. येत्या काळात गुगल अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करेल अशी आशा  करत शुभेच्छा देऊ या.
 
 





 Edited by - Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली

नेपाळी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर ५ जणांना अटक

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला इशारा, बैठकीपूर्वी अजेंडा लीक झाल्याने मुख्यमंत्री संतापले

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन मुलींचा मृत्यू

पुढील लेख
Show comments