Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा

Webdunia
नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या गुगलच्या नव्या फीचरचं नाव असून याद्वारे नोकरीच्या शोधात असणा-यांचं काम सोपं व्हावं हा गुगलचा प्रयत्न आहे.
 
सध्या हे फीचर केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध असणार आहे. याशिवाय काही राज्य सरकारांसोबतही गुगलची बोलणी सुरू आहेत. गुगलने अनेक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. TimesJobs, Shine.Com आणि LinkedIn यांसारख्या अनेक संकेतस्थळांसोबतही गुगलने 
 
भागीदारी केली आहे. या फीचरद्वारे नोकरीचा शोध घेणं सहज-सोपं व्हावं हा गुगलचा प्रयत्न आहे.
 
यात गुगल सर्चमध्ये केवळ Jobs near me किंवा Jobs for fresher असे कीवर्ड्स लिहिल्यास तुमच्या समोर गुगलचा नवा डॅशबॉर्ड सुरू होईल. येथे नोक-यांची यादी दिसेल, तेथे क्लिक करुन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एका जॉब व्हॅकेन्सीवर क्लिक केल्यास 
 
तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. सर्वप्रथम नोकरीबाबत माहिती असेल, त्यानंतर पात्रता किती असावी याबाबत आणि कोणत्या संकेतस्थळावर नोकरीची माहिती आहे हे दिसेल आणि तुम्ही तेथून अर्ज करु शकतात. येथे सेव्ह करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.
 
नोकरी शोधताना प्रेफेरेंस सेट करु शकतात. म्हणजे पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब, लोकेशन, जॉब टायटल आणि अनुभव आदी गोष्टी तुम्हाला हव्या त्याप्रमाणे सेट करता याव्यात यासाठी कंपनीने स्मार्ट फिल्टर दिलं आहे. तसंच यामध्ये अलर्ट फीचर देखील आहे , म्हणजे 
 
तुम्ही शोधत असलेल्या नोकरीसारखी एखादी संधी असेल तर तुम्हाला इमेल पाठवून माहिती दिली जाईल. 

संबंधित माहिती

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख
Show comments