Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता Google Pay वर ट्रांझेक्शन करणे सोपे आणि सुरक्षित, जाणून घ्या कसे

आता Google Pay वर ट्रांझेक्शन करणे सोपे आणि सुरक्षित, जाणून घ्या कसे
, सोमवार, 15 मार्च 2021 (13:05 IST)
टेक दिग्गज कंपनी Google ने आपल्या पेमेंट अॅप Google Pay यात नवीन फीचर्स देण्याची घोषणा केली आहे. याने ट्रांझेक्शन अजूनच सुरक्षित होईल. सोबतच यूजर्सला डिजीटल भुगतान प्लॅटफॉर्मवर देणं-घेणं डेटा मॅनेज करण्यासाठी अधिक पर्याय आणि ताबा मिळेल. यूजर्स पर्सनल घेणंदेणं आणि क्रियाकलापाचे रेकॉर्ड बघू शकतील आणि ट्रांझेक्शन हिस्ट्री डिलीट देखील करू शकतील. हे फीचर Google Pay च्या नवीन अपडेटसह जारी केले जाईल. या फीचरला प्रायव्हेट डेटाचा मिसयूज होण्यापासून बचावासाठी आणले जात आहे. मर्चेंटसाठी हे जारी केले जाणार नाही.
 
ट्रांझेक्शन डिलीट किंवा टोकननाइज्ड करू शकाल
गूगल पे च्या या नवीन फीचर अंतर्गत यूजर्स आपल्या शेवटल्या 10 यूपीआय ट्रांझेक्शन डिलीट किंवा टोकननाइज्ड करू शकतात. याने या ट्रांझेक्शनचा एक्सेस गूगलला मिळू शकणार नाही. उल्लेखनीय आहे की क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड टोकननाइज्ड एक प्रोसेस असते, ज्याने कंपनीला इंटरनल नेटवर्कने सेंसिटीव्ह डेटा हटविण्यात येईल. सोबतच यूजर्सला हे कंट्रोल मिळेल आणि ते अॅपच्या आंतरिक सुविधेला पर्सनलाइज करू शकाल.
 
कॉन्टेक्टलॅस कार्ड ट्रांझेक्शन
नवीन फीचर्समध्ये कंपनी यूजर्सला यूपीआय व्यतिरिक्त कॉन्टेक्टलॅस कार्ड ट्रांझेक्शनची सुविधा असेल. यासाठी टोकननाइज्ड डेबिट किंवा क्रेडिट कार्ड यूज केले जाईल, जे त्यांच्या स्मार्टफोनशी लिंक असेल. नवीन अपडेटनंतर यूजर या प्रकाराची ट्रांझेक्शन हिस्ट्री डिलीट करू शकतील. तसेच गूगल केवळ तेच डेटा स्टोअर करू शकेल जे ट्रांझेक्शनसाठी आवश्यक असेल.  
 
अजून रिवार्ड मिळतील
यूजर्सला गूगल पे अंतर्गत त्यांच्या क्रियाकलापांच्या आधारावर अधिक प्रासंगिक ऑफर आणि पुरस्कार मिळतील, ज्यात देणंघेणं इतिहास देखील सामील असेल. तसेच हे यूजर्सवर अवलंबून असेल त्यांना कंट्रोल फीचर्स सुरु ठेवायचे आहे वा नाही. फीचर सुरु न केल्यावर ते अॅप आधीप्रमाणेच वापरु शकतील आणि यासाठी काही परिवर्तन करावे लागणार नाही.
 
डेटा शेअर होणार नाही
कंपनीने आपल्या एका वक्तव्यात म्हटले की यूजर्सची वैयक्तिक माहिती कधीही कोणालाही विकली जाऊ शकत नाही आणि विज्ञापनांना टार्गेट करण्यासाठी यूजर्सला देणघेणची हिस्ट्री इतर गूगल उत्पादासह शेअर करता येणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूर येथे धंतोली स्थित LIC स्टॉफ क्वाटर्समध्ये 23 कोरोनाबाधित आढळले