Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड मध्ये अग्रभागी JioFiber, मोबाइल इंटरनेट स्पीड मध्ये Vodafone-idea सर्वात पुढे

ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड मध्ये अग्रभागी JioFiber, मोबाइल इंटरनेट स्पीड मध्ये Vodafone-idea सर्वात पुढे
, शनिवार, 13 मार्च 2021 (11:33 IST)
ब्रॉडबँड आणि फिक्सड लाइन इंटरनेट स्पीड मध्ये जियो फाइबरने सर्वांना मागे सोडले आहे. 2020 च्या शेवटल्या तिमाहीत जियो फाइबरने डाउनलोड स्पीड च्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडले आहे. यात जियो फाइबरने Airtel, ACT Broadband, Exicitel सारख्या अनेक इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर्सला मागे सोडले आहे.
 
ब्रॉडबँड च्या बाबतीत सर्वात पुढे JioFiber Ookla द्वारा जाहीर करण्यात आलेल्या रिर्पोटप्रमाणे ब्रॉडबँड इंटरनेट डाउनलोड स्पीड च्या बाबतीत जियो फाइबरने इतर कंपन्यांना मागे सोडले आहेत तसेच भारताने SAARC देशांना पछाडले आहेत. अथार्त SAARC मध्ये येणार्‍या देशांपेक्षाही ब्रॉडबॅड डाउनलोड स्पीड भारतात आहे. तथापि, मोबाइल इंटरनेटच्या माध्यमामध्ये भारत अजूनही खूपच मागे आहे. त्याच वेळी भारतात मोबाइल इंटरनेट डेटा गतीबद्दल बोलयाचे तर व्होडाफोन-आयडिया म्हणजे Vi सर्वात पुढे आहे. मोबाइल इंटरनेट डेटा स्पीड च्या बाबतीत Vi जियो, एयरटेल, बीएसएनएल या सर्वांपेक्षा पुढे आहे.
 
JioFiber चा सरासरी वेग 
Ookla ची लेटेस्ट रिपोर्टप्रमाणे JioFiber रेटिंगच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. जियोफाइबरला सर्वात अधिक रेटिंग मिळाली आहे. यूजर्सने 3.7 स्टार नेट प्रोमोटर स्कोअरद्वारे रेटिंग जियो फाइबरला‍ दिली आहे. जर आपण जियोफाइबरच्या स्पीडबद्दल विचार करत असाल तर रिपोर्टप्रमाणे जियोफाइबरची सरासरी डाउनलोड स्पीड 80 Mbps होती.
 
या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर ACT Broadband आहे ज्याची डाउनलोडिंग स्पीड सुमारे 75 Mbps आहे. Airtel ब्रॉडबँड सेवा एयरटेल एक्सट्रीम तिसर्‍या क्रमाकांवर आहे. आणि त्याची डाउनलोडिंग स्पीड 68 Mbps इतकी आहे. या व्यतिरिक्त BSNL Broadband चा सरासरी वेग 40 Mbps पेक्षा कमी आहे. 
 
मोबाइल इंटरनेट स्पीड मध्ये अग्रभागी Vi 
मोबाइल इंटरनेट स्पीड बद्दल बोलायचे तर भारतात या बाबतीत व्होडाफोन- आयडीया अग्रभागी आहे. मोबाइल इंटरनेटच्या बाबतीत या कंपनीची स्पीड 14 Mbps आहे. या यादीत दुसर्‍या क्रमांकावर एयरटेल कंपनी आहे आणि ब्रॉडबँडच्या बाबतीत सर्वात उच्च क्रमाकांवर राहणारी कंपनी जियो मोबाइल इंटरनेट डेटा स्पीड च्या बाबतीत सर्वात मागे अर्थात तिसर्‍या क्रमांकावर आहे. जियोचा सरासरी मोबाइल इंटरनेट वेग 10 एमबीपीएसची आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयपीएमुळे इंग्लंडचा संघ मर्यादित षटकांमध्ये अव्वलस्थानी