Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन ऑपरेटिंग सिस्टिम Android 11 च्या बिटा व्हर्जनची टेस्टिंग सुरू

नवीन ऑपरेटिंग सिस्टिम Android 11 च्या बिटा व्हर्जनची टेस्टिंग सुरू
, गुरूवार, 23 जुलै 2020 (15:34 IST)
गुगलने स्मार्टफोनसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम Android 11 च्या बिटा व्हर्जनची टेस्टिंग सुरू केली आहे.  लवकरच हे अपडेट सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाईल. पण, याबाबत एक महत्त्वाची माहती समोर आली आहे. 2GB किंवा त्यापेक्षा कमी रॅम असलेल्या स्मार्टफोनला Android 11 चा सपोर्ट मिळणार नाही. मात्र आधीपासून  असलेले 2जीबी रॅमचे जे डिव्हाइस जुन्या अँड्रॉइड व्हर्जनसह लाँच झाले होते, त्यांना या बदलाचा फटका बसणार नाही असं सांगितलं जात आहे.  
 
XDA डेव्हलपर्स आणि जीएसएम-एरीनाच्या रिपोर्टनुसार, गुगलच्या डिव्हाइस कॉन्फिगरेशन गाइडची एक प्रत लीक झाली आहे.  त्यानुसार, अँड्रॉइड 11 ओएससाठी किमान 2जीबी रॅम असणं आवश्यक आहे. ज्या डिव्हाइसचा रॅम 2जीबीपेक्षा कमी असेल त्यावर Android 11 काम करणार नाही. त्या डिव्हाइससाठी युजर्सना ‘अँड्रॉइड गो’ ओएसवर काम करावं लागेल. याशिवाय, 512MB रॅमसोबत येणाऱ्या डिव्हाइसना यापुढे प्री-लोडेड गुगल मोबाइल सर्व्हिसही मिळणार नाही. याचा थेट गुगलने या डिव्हाइससाठी सपोर्ट बंद केला असा निघतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता आयपीएलच्या तयारीला येणार वेग; यूएईत पुन्हा एकदा रंगणार थरार