Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असे डाउनलोड करा ई-आधार

असे डाउनलोड करा ई-आधार
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार अनिवार्य केले आहे. आपला आधार कार्ड बनलेला असेल आणि त्यांचे प्रिंट आपल्याकडे नसल्यास आपण ई-आधार प्राप्त करू शकता आणि त्यासाठी सोपी विधी जाणून घ्या:
 
सर्वात आधी आपण uidai.gov.in वेबसाइटवर जा.
येथे उजव्या बाजूला Download Aadhaar आधार दिसेल. यावर क्लिक करा.
नवीन पेज उघडल्यावर आपल्याला सर्व माहिती भरावी लागेल. यावर आधार बनला असल्यास आधार यावर क्लिक करावे लागेल. नंतर आधार नंबर, नाव, पिनकोड आणि सिक्योरिटी कोड टाकावे लागेल.
यानंतर मोबाइलवर ओटीपी येईल. आधारला जुळलेल्या नंबरवरच ओटीपी येईल.
नंतर आपण ओटीपी भरून दिल्यावर आपल्या सिस्टमवर आधार कार्ड डाउनलोड होईल.
सिस्टमवर डाउनलोड झाल्यावर हे उघडण्यासाठी आपल्याला आपल्या नावाचे अक्षर कॅपिटलमध्ये आणि जन्मवर्षाचे चार अंक टाइप करावे लागतील, हेच आपले पासवर्ड असेल. आता आपले आधार आपल्यासमोर उघडेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट