Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनला जबरदस्त झटका, भारत सरकारने आणखी 47 चिनी अ‍ॅप्स केले बॅन

चीनला जबरदस्त झटका, भारत सरकारने आणखी 47 चिनी अ‍ॅप्स केले बॅन
, सोमवार, 27 जुलै 2020 (13:49 IST)
चीन आणि भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. चीनने केलेल्या कुरघोडींना उत्तर म्हणून गेल्या महिन्यात केंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अ‍ॅप्स बॅन केले होते. यानंतर भारताने आणखी 47 अ‍ॅप्स बंद केले आहे. या 47 अ‍ॅप्सची यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे.
 
इंडिया टूडेनं दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता 250हून अधिक चिनी अ‍ॅप्सची तपासणी करत आहे. यात युझरच्या प्रायव्हसी किंवा माहितीचे उल्लंघन तर होत नाही आहे ना, याची पाहणी केली जाणार आहे. मुख्य म्हणजे भारतानं तयार केलेल्या यादीमध्ये अलिबाबा (Alibaba), पब्जी (PUBG), टेन्सेंट (Tencent), झिओमी (Xiaomi) सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचाही समावेश आहे.
 
याआधी भारताने चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये टिकटॉक, यूसी आणि हेलोसारखे अनेक अ‍ॅप आहेत. भारतानं घेतलेल्या या निर्णयानंतर चीनला मात्र चांगल्या मीर्च्या झोंबल्या होत्या. भारत अमेरिकेची नक्कल करत आहे. चीनी वस्तू, अ‍ॅपवर बहिष्कार घालण्यासाठी भारत अमेरिकेसारख्या सबबी शोधत असल्याचं चीन मीडियाने म्हटलं होते.
 
चीन अ‍ॅप करत होते गैरवापरचायना अ‍ॅप्सच्या माध्यमातून चीन Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर काही अ‍ॅप्सचा गैरवापर करत आहे. हे अ‍ॅप्स गुप्तपणे आणि बेकायदेशीरपणे वापरकर्त्याचा डेटा चोरून तो भारताबाहेरील सर्व्हरवरला पाठवत होते. या व्यतिरिक्त भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र, गृह मंत्रालय यांनाही अशा धोकादायक अ‍ॅप्सवर तातडीनं बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार 59 अ‍ॅप्स भारतात न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

BREAKING : मराठा आरक्षणावर सुनावणीसाठी नवी तारीख