JIO यूजर्ससाठी खुशखबरी, कंपनीने परत केला धमाल

बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (13:17 IST)
मुकेश अंबानी यांचे रिलायंस जियो 4जी सरासरी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना लागोपाठ 20व्या महिन्यात (ऑगस्ट-2019) बरेच मागे सोडले आहे. भारतीय दूरसंचार नियामक संस्था(ट्राई)ने मंगळवारी प्रसिद्ध केलेले 4जी सरासरी डाउनलोड स्पीड आकड्यांमध्ये रिलायंस जिओ   आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या वोडाफोन, आयडियाशी किमान तीनपट आणि एअरटेलशी अडीचपट पुढे होती. रिलायंस जिओची ऑगस्टमध्ये 4जी सरासरी डाउनलोड स्पीड जुलैमध्ये 21 एमबीपीएसहून वाढून 21.3 एमबीपीएसवर पोहोचली आहे. एअरटेलची या दरम्यान 8.8 पेक्षा कमी होऊन 8.2 एमबीपीएस राहिली आहे.  
 
पाचव्या महिन्यात कमी झाली एअरटेलची स्पीड
 
एअरटेलची स्पीड एप्रिलपासून सतत कमी होत आहे. एप्रिलमध्ये ही 9.5 एमबीपीएस होती जी मे मध्ये 9.3 आणि जूनमध्ये पडून 9.2 एमबीपीएस राहिली होती. वोडाफोन आणि आयडियाचे विलय झाले आहे पण ट्राय दोघांच्या आकड्यांना वेग वेगळे प्रसिद्ध करतो. आयडियाची ऑगस्टमध्ये 4जी सरासरी डाउनलोड स्पीड जुलैमध्ये 6.6 पेक्षा कमी होऊन 6.1 एमबीपीएस राहिली आहे जेव्हा की वोडाफोनची 7.7 वर स्थिर राहिली.   
 
वोडाफोन अपलोड स्पीडमध्ये पुढे 
 
4जी सरासरी अपलोड स्पीडच्या बाबतीत वोडाफोन 5.5 एमबीपीएससोबत पुढे राहिली पण जुलैच्या 5.8 एमबीपीएसपासून कमी झाली. आयडियाची 4 जी सरासरी अपलोड स्पीड ऑगस्टमध्ये 5.1 तर एअरटेलची 3.1 राहिली. या श्रेणीत देखील रिलायंस जियोने सुधार केला आणि त्याची 4जी सरासरी अपलोड  स्पीड जुलैच्या 4.3 पासून वाढून 4.4 एमबीपीएस एवढी झाली आहे. ट्राय सरासरी स्पीडची गणना रिअल टाइम आकड्यांच्या आधारावर करतो जे त्याच्या मायस्पीड अॅप्लीकेशनच्या साहाय्याने एकत्रित केले जातात.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख ठाणे येथे प्रवासी बस मध्ये पाण्यातील मगरी, काय आहे हे प्रकरण जाणून घ्या