Festival Posters

TikTok वर व्हायरल होण्यासाठी ट्रेनिंग, एका महिन्याची फी जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (16:46 IST)
Tiktok बद्दल तर आपल्याला माहीतच असेलच. टिकटॉक अॅप भारतात फेसबुकसाठी समस्या निर्माण करत आहे. टिकटॉकवर काही दिवसांपूर्वीच भारतात प्रतिबंध लागल्यामुळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला, सुमारे 2 आठवड्यांसाठी बंदी असल्यानंतर टिकटॉक Google Play Store आणि App Store वर परतलं आहे. टिकटॉकवर लहान-लहान व्हिडिओ बनवून लोक पैसे देखील कमवत आहे. आपण देखील टिक टॉकवर व्हायरल होऊ इच्छित असल्यास आपण त्यासाठी प्रशिक्षण देखील घेऊ शकता.
 
* टिक टॉकवर व्हायरलचे प्रशिक्षण कुठे मिळेल आणि त्याची फी किती?
 
एका अहवालानुसार चिनी लघु व्हिडिओ अॅप TikTok ने आपल्या कमाईचा पाठपुरावा करण्यासाठी भारतात ट्रेनिंग क्लासेस, वर्कशॉप आणि मेकअपची सुरुवात केली आहे. त्यात वापरकर्त्यांना इन्फ्लुएंसर बनणे आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे गुण शिकवले जातील. टिकटॉक च्या वर्कशॉपमध्ये सोशल मीडियावर त्वरित व्हिडिओ एडिट, व्हिडिओ तयार करणे आणि व्हायरल कसे करावे या बाबद सांगण्यात येईल. हे लोकांना सोशल मीडिया ट्रेंडबद्दल देखील माहिती देईल. 
 
दिल्लीमध्ये TikTok साठी ट्रेनिंग क्लासेज सुरू देखील झाल्या आहे. साप्ताहिक क्लाससाठी आपल्याला एका महिन्यात 7000 रुपये शुल्क भरावे लागेल. यात TikTok इन्फ्लुएंसर प्रशिक्षण देतील. प्रत्येक सत्रात 10 विद्यार्थी असतील. "सेलिब्रिटी फेस" नावाची टीम क्लासेज चालवीत आहे. सेलिब्रिटी फेसच्या एका प्रतिनिधीप्रमाणे वर्गात आपल्याला थ्योरीसह प्रॅक्टिकल देखील शिकवले जाईल. प्रतिनिधी प्रमाणे टिकटॉकवर शेअर होणारे 90 टक्के व्हिडिओ व्हायरल होत नाही. क्लासमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना टिकटॉक स्टार्ससह पोर्टफोलिओ शूट करण्याची संधी मिळेल. 
 
सेलेब्रिटी फेस नावाची ही कंपनी दिल्लीमध्ये स्थित आहे आणि आपल्या इन्फ्लुएंसरसह जयपूर, दिल्ली, भोपाळ, गुवाहाटी, कोलकाता आणि अहमदाबाद सारख्या शहरांत दिवसभर शूटिंग करत असतात. सुमारे 500 लोकांना शूटिंगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. 
 
प्रत्यक्षात, सोशल मीडियाने प्रमोशनचा संपूर्ण मार्गच बदलला आहे. आता पूर्वी सारखे नसून मोठ्या-मोठ्या कंपन्या त्या लोकांना शोधत आहे ज्यांचे सोशल मिडियावर चांगले फॉलोअर्स आहेत. जर TikTok वर आपले चांगले फॉलोअर्स आहेत तर आपण एखाद्या कंपनीच्या उत्पादनास प्रमोशन करून पैसे कमावू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: १ जूनपासून नागपूर विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द केली जाणार

हेल्मेट किंवा सीट बेल्टशिवाय वाहन चालवणे अडचणीत आणेल! दंडासोबतच तुमचा परवानाही निलंबित केला जाईल

राहुल गांधी नेहमी स्वप्नांच्या दुनियेत वावरतात; मंत्री संजय शिरसाठ यांची टिपण्णी

अहिल्यानगरमध्ये आंब्याचा रस खाल्याने एकाच कुटुंबातील सात सदस्यांना विषबाधा

पंतप्रधान मोदींना झालमुरी देणाऱ्या दुकानदाराला सुरक्षा, सीआरपीएफ जवान तैनात

पुढील लेख
Show comments