Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Net Speed increase :नेट स्पीड वाढविण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Webdunia
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (11:24 IST)
फोन करण्यासाठी किंवा मेसेजिंगसाठी जरी आपण मोबाईलचा जास्त वापर करत नसलो तरी इंटरनेट चालवण्यासाठी वापरतो. अशा परिस्थितीत जेव्हा आपल्या मोबाईलचा नेट स्लो चालू असतो तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो. बऱ्याच वेळा महत्त्वाची माहिती नेटस्पीड स्लो असल्यामुळे मिळत नाही. इंटरनेटची स्पीड फास्ट कशी करायची या साठी या टिप्स अवलंबवा.
 
1 अॅप्सचा पार्श्वभूमी वापर बंद करा
आपल्या मोबाईलमध्ये असे अनेक अॅप्स आहेत जे आपण चालवत नाही, तरीही ते आपला मोबाईल डेटा वापरत राहतात आणि आपल्याला माहितही नसते. हे तपासण्यासाठी, Settings मध्ये Data usage वर जा आणि कोणते अॅप अधिक डेटा वापरत आहे ते पहा. यानंतर, त्या अॅपचा बॅकग्राउंड वापर बंद करा जेणेकरून तुम्ही ते अॅप चालवताना मोबाइल डेटा वापरू शकेल.
 
2 निरुपयोगी अॅप्स काढा-
 वापरत नसलेले अ‍ॅप्स अनइंस्टॉल करा , कारण त्या अ‍ॅप्सचा मोबाइलमध्ये काही उपयोग नाही आणि ते अ‍ॅप्स मोबाइल डेटाही वापरतात, त्यामुळे  नेटला चांगली  स्पीड मिळत नाही. नको असलेल्या  अॅप्स काढून टाका.
 
3 कॅशे साफ करा-
 नेट वापरताना वेबपेजची माहिती कॅशे मेमरीमध्ये सेव्ह होते. या कारणास्तव, मोबाइलमध्ये भरपूर कॅशे डेटा साचलेला असतो, आणि मोबाइल इंटरनेटचा वेग देखील कमी होतो. त्यामुळे वेळोवेळी कॅशे साफ करत रहा. कॅशे साफ केल्याने इंटरनेट स्पीड वाढते. 
 
4 ब्राउझर अपडेट करा-
आमचा ब्राउझर अप टू डेट नसेल तर चांगल्या इंटरनेट स्पीडची अपेक्षा अशक्य आहे सर्व प्रथम मोबाइल ब्राउझर अपडेट करा. कारण जुन्या ब्राउझरमध्ये काही उणीवा आणि Errors असतात, ज्या नवीन अपडेटमध्ये सुधारित असतात . ब्राउझर अपडेट केल्या नंतर इंटरनेट स्पीडमध्ये सुधारणा होते.
 
5 रॅम साफ करा-
मोबाइलमधील सर्व अॅप्स सर्व मोबाइल डेटा वापरतात. त्यामुळे मोबाईलच्या वेगवेगळ्या अॅप्स डेटाचा वापर केल्यावर ब्राउझरला कमी डेटा मिळतो, त्यामुळे  इंटरनेटची स्पीडही कमी होऊ लागतो. त्यामुळे मोबाईलची रॅम (रँडम अ‍ॅक्सेस मेमरी) वेळोवेळी क्लिअर करावी. असं केल्याने वापरत असलेल्या अॅपला सर्व मोबाईल डेटा मिळेल.

Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments