Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जियो गीगाफाइबरचा नवीन प्लान, इंटरनेटच्या माध्यमाने उपलब्ध होतील टीव्ही चॅनल, मिळेल अनलिमिटेड कॉलिंग

जियो गीगाफाइबरचा नवीन प्लान, इंटरनेटच्या माध्यमाने उपलब्ध होतील टीव्ही चॅनल, मिळेल अनलिमिटेड कॉलिंग
, मंगळवार, 23 एप्रिल 2019 (13:34 IST)
रिलायंस जियोच्या यशानंतर आता कंपनी गीगाफाइबर सर्विसला 1600 शहरांमध्ये रोलआउट करणार आहे. ज्याने GigaFiber सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल. एका अधिकार्‍याने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायंस जियो गीगा फाइबर ब्रॉडबँड लँडलाइन - टीवी कोंबो सर्विसची सुरुवात करणार आहे, ज्याचा एका महिन्याची किंमत 600 रुपये राहणार आहे. त्याच सोबत ग्राहकांना काही इतर फायदे देखील मिळतील. या प्लानची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे तुम्ही किमान 40 उपकरणांना स्मार्ट होम नेटवर्कशी जोडू शकता. या सुविधेसाठी तुम्हाला एक हजार रुपये मोजावे लागणार आहे.  
 
मिळेल अनलिमिटेड कॉलिंग 
या प्लानमध्ये तुम्हाला लँडलाइनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे आणि टीव्ही चॅनल तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमाने उपलब्ध करवण्यात येतील. सांगायचे म्हणजे इंटरनेटच्या माध्यमाने टीव्ही चॅनल उपलब्ध केल्याने त्याला इंटरनेट प्रोटोकॉल टेलीविजन म्हणतात.   
 
ओएनटीच्या माध्यमाने मिळतील सेवा
ग्राहकांना ह्या सर्व सेवा ऑप्टिकल नेटवर्क टर्मिनल अर्थात ओएनटीच्या माध्यमाने मिळतील. ऑप्टिकल नेटवर्क टर्मिनल बॉक्स रूटरच्या माध्यमाने ग्राहक 40 ते 45 उपकरणांना जोडू शकतील, ज्यात टीव्ही, मोबाइल फोन, लॅपटॉप आणि टॅबलेट सामील आहे. त्याशिवाय ग्राहकांना गेमिंगची सुविधा देखील मिळेल.
 
भारताला ट्रांसफॉर्म करण्यासाठी सादर होत आहे जियो गीगाफाइबर
मुकेश अंबानी यांनी म्हटले होते की जियो मोबिलिटी सर्विसेज सोबतच गीगाफाइबर फिक्सड-ब्रॉडबँड सर्विसला भारतात ट्रांसफॉर्म करण्यासाठी सादर करण्यात येत आहे. मुकेश अंबानी यांनी हे ही म्हटले की गीगाफाइबर सर्वात मोठा ग्रीनफील्ड फिक्स्ड लाइन ब्रॉडबँड रोलआउट असेल.   
 
जोरदार राहणार आहे सामना
जियो गीगाफाइबर आल्यानंतर याचा सरळ सामना बीएसएनएलशी होणार आहे. सांगायचे म्हणजे की बीएसएनएलने आपल्या एफटीटीएच ब्रॉडबँड सेवेला   भारत फाइबरच्या नावाने काही दिवसांअगोदर सुरू केले होते. त्याशिवाय एयरटेल देखील वी-फाइबर प्लान यूजर्सला बरेच चांगले फायदे देत आहे. असे मानले जात आहे की जियो गीगाफाइबर आल्यानंतर आता या सेगमेंटमध्ये देखील प्राइस वार सुरू होऊ शकतात, आणि त्याचा फायदा ग्राहकांना नक्कीच   होईल.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकसभा निवडणूक 2019: किती महिलांना तिकीट देण्यात आलं आहे?