Dharma Sangrah

व्हाट्सएपवर देण्यात येणार्‍या धमक्या किंवा अश्लील संदेशांवर सरकार करेल कारवाई

Webdunia
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (11:41 IST)
केंद्र सरकारने व्हाट्सएपवर आपत्तीजनक संदेश आणि धोक्याची तक्रार दूरसंचार विभागात नोंदणी करण्याची सुविधा सुरू केली आहे. पीडितांना तक्रार करण्यासाठी मोबाइल नंबरसह संदेशाचा स्क्रीनशॉट घेणे आवश्यक आहे. दूरसंचार विभागाची हेल्पलाइनवर जारी केलेल्या ई-मेलवर पाठवावे. त्यानंतर विभाग त्यावर कारवाई करेल. चला जाणून घेऊ.
 
पुलवामा हल्ल्यानंतर बर्‍याच लोकांना व्हाट्सएपवर अपमानकारक संदेश आणि धमक्या देण्यात आल्या आहेत.  विभागाने हेल्पलाइन म्हणून ई-मेल आयडी ccaddn-dot@nic.in तयार केले. जर कोणाला अपमानकारक, आपत्तीजनक, धमक्या किंवा अश्लील संदेश मिळत असतील तर मोबाइल नंबरासह संदेशाचा स्क्रीनशॉट घेऊन यावर पाठवावे. 
 
विभागाचे कम्युनिकेशंस कंट्रोलर आशिष जोशी यांनी ट्विट केले की आम्ही त्वरित कारवाईसाठी दूरसंचार कंपन्या आणि पोलिस प्रमुखांशी चर्चा करू. सूचना व प्रौद्योगिकी मंत्रालयाकडून मॉब लिंचिंगच्या समस्येवर बर्‍याच वेळा संदेशांवर नियंत्रण ठेवण्याची बाब करण्यात आली होती पण दूरसंचार विभागाने हेल्पलाइन म्हणून ई-मेल आयडी जारी करून नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या बाबतीत नाव कमावले आहे. 
 
केंद्रीय सूचना प्रौद्योगिकी मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले डिजिटलीकरण आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरादरम्यान भारताला डिजीटल प्लॅटफॉर्मची सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते"; लग्न मोडल्यानंतर मानधनाचे मोठे विधान

महाराष्ट्राला पंप साठवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

पुणे: रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात तोडफोड, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पोलीस संरक्षण देत आहे का? मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

पुढील लेख