Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

OPPO F17 हे OPPO च्या शृंखलांमधील फोन 2 सेप्टेंबरला लॉन्च करण्यात येणार आहेत. काय असणार स्पेक्स (फीचर्स) जाणून घेऊ या...

Webdunia
गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (17:51 IST)
Oppo F17 आणि Oppo F17 Pro हे Oppoच्या नवी शृंखलांचे फोन येता 2 सप्टेंबर रोजी भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. आणि हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजेपासून सुरू होणार आहे. कार्यक्रमासाठी मीडियाला आमंत्रणे पाठविण्यात आले आहेत. Oppoच्या अधिकृत असलेल्या ट्विटर हॅण्डल वरून या प्रक्षेपित तारखेची पुष्टी देखील केली गेली आहे.
 
Oppoचे म्हणणे आहे की F17 च्या शृंखलेमध्ये वर्ष 2020 च्या स्लीकेस्ट फोन्स पैकी एक आहे आणि कंपनीने अनेक खास स्पेक्सची पुष्टी देखील केली आहे. त्याच्यासह फोन कसा दिसणार आहे हे शेअर केले आहे. Oppo ने एक ऑनलाईन संगीत कार्यक्रम देखील आयोजित केला आहे ज्यामध्ये काही आवडते कलाकार त्यांची प्रस्तुती देणार आहे. Oppoने अलीकडेच पुष्टी केली की F17 आणि F17 Pro 25,000 रुपयांचा श्रेणींमध्ये लॉन्च केला जाणार आहे.
 
कंपनीने अलीकडेच आपले बजेटफोन  Oppo A53 2020 देखील बाजारपेठेत आणला आहे. चला जाणून घेऊ या आता पर्यंत आलेल्या  F17 आणि  F17 Pro च्या वैशिष्ट्याबद्दल.
 
OPPO F17 PRO SPECIFICATIONS -
 
Oppo F17 Pro ला पातळ आणि वजनात हलकं(लाइटवेट) असणारे डिझाइन देण्यात येणार आहे. फोन मध्ये 6.4 इंच ची फुल HD+ AMOLED स्क्रीन मिळणार आणि रिझोल्यूशन  2400 x 1080 पिक्सल असेल. स्क्रीनच्या टॉप वर ड्युल -होल कट आऊट दिले जाणार ज्यामध्ये दोन सेल्फी कॅमेरे   असणार. फोन मॅट ब्लॅक, मॅजिक ब्लु आणि मेटॅलीक व्हाईट विकल्पांसह प्रक्षेपित(लॉन्च) केले जाणार.
 
F17 Pro मीडियाटेक हीलियो P95 चिपसेट द्वारे चालविणे जाणार आहे. आणि फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित कलर OS 7.2 वर कार्य करणार.
 
Oppo F17 Pro मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये एक 48 MPचा प्रायमरी कॅमेरा, 8 MPचा अल्ट्रा -वाइड अँगल कॅमेरा, 2 MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2 MP चा डेप्थ सेन्सर असणार. फोनच्या पुढील बाजूस (फ्रंट वर)16 मेगापिक्सलचा एक कॅमेरा मिळेल आणि दुसरा कॅमेरा 2 MP डेप्थ सेन्सर असणार. रियर कॅमेरा ने 30 FPS वर 4K UHD रेकॉर्डिंग करता येऊ शकेल.
 
फोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी मिळेल आणि हे  VOOC 4.0 ते 30W चार्जिंग सपोर्ट करणार.
 
OPPO F17 वैशिष्ट्ये (स्पेसिफिकेशन)-
 
Oppo F17 मध्ये 6.44 इंच ची फुल HD+ डिस्प्ले मिळणार जी AMOLED पॅनल असेल आणि डिस्प्ले च्या पुढील बाजूस वॉटरड्रॉप नॉच दिले जाणार ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा असणार.
 
फोन क्वालकॉम स्नैपड्रैगन 662 प्रोसेसर द्वारे चालविण्यात येईल आणि हे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह जोडले जाणार. रेग्युलर F 17 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये एक 16 MPचा कॅमेरा असेल, दुसरा कॅमेरा 8 MPचा अल्ट्रा- वाइड-अँगल कॅमेरा, तिसरा 8 MP चा मॅक्रो कॅमेरा, आणि चवथा 2 MP चा डेप्थ सेन्सर असेल. फोनच्या पुढील बाजूस फ्रंट ला एक 16 MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल.
 
F17 मध्ये 4,000mAh ची बॅटरी असणार जी 30W जलद चार्जिंग (फास्टचार्जिंग)ला सपोर्ट करणार. OPPO F 17 हे डायनॅमिक ऑरेंज, नेव्ही ब्लु आणि क्लासिक सिल्व्हर रंगात आणला जाऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गिरीराज सिंह यांचा मोठा दावा, यावेळी महाराष्ट्र-झारखंडमध्ये डबल इंजिनचे सरकार येणार

पुण्यात मतदानाचा नवा विक्रम, एवढ्या टक्क्यांनी मतदान वाढले

यमुना एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात लहान मुलासह 5 जणांचा मृत्यू

पालघरमध्ये कारखान्यात लागली भीषण आग, व्हिडीओ वायरल

LIVE: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचे भाकीत वर्तवले

पुढील लेख
Show comments