Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेटीएमची पेमेंट बँक सुरु, शून्य बँलेन्सवर दंड नाही

Webdunia
बुधवार, 24 मे 2017 (13:00 IST)

पेटीएमने आपली पेमेंट बँक लॉन्च केली आहे. कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करुन याची माहीती दिली. या नव्या सेवेत पेमेंट बँकेतील जमा रकमेवर खातेदारांना 4 टक्के व्याज मिळणार आहे. रिझर्व बँकेकडून पेटीएमला पेमेंट बँकेचा परवाना नुकता मिळाला असून, यानुसार पेटीएमने ही नवी सेवा सुरु केली. या बँकिंग सेवेच्या माध्यमातून कंपनी 31 ब्रांच आणि 3000 कस्टमर पाईंट सुरु करणार आहे.

पेटीएमने ही सेवा सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली असून, याचा वापर कंपनीचे कर्मचारी आणि काही निवडक व्यक्तींनाच याचा वापर करता येणार आहे. जर पेटीएम यूजर्सना ही सेवा वापरायची असल्यास, त्यांना त्यांच्या पेटीएमवरुन इनव्हीटेशन रिक्वेस्ट पाठवावी लागेल. विशेष म्हणजे, तुम्हाला तुमच्या खात्यावर कमीत-कमी किती पैसे ठेवावे, याचं कोणतंही बंधन नाही. म्हणजे, जर तुमच्या खात्यावर शून्य बँलेन्स असला, तरी त्यावर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. तसेच NEFT आणि RTGS साठीही कसलंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही.पेटीएम आपल्या पेमेंट बँक यूजर्सना Rupay डेबिट कार्ड देणार आहे. ज्यासाठी कंपनी वार्षिक 100 रुपये आणि डिलिव्हरी चार्जेस घेईल. पण कार्ड हारवल्यास यूजर्सना 100 रुपये द्यावे लागतील.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments