शिवजयंतीचा उत्साह सोशल मीडियावरही दिसत आहे. सकाळपासूनच ट्विटरवर भारतातील ट्रेंडिगवर असलेल्या हॅशटॅगमध्ये #ShivajiMaharaj टॉप ट्रेंडवर आहे.सकाळी 10 वाजेपर्यंत 15 हजारपेक्षा जास्त ट्विट्स हा हॅशटॅग वापरून केले आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातील लोकही हा हॅशटॅग वापरुन ट्विट्स करत आहेत. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे काही काळ दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत होते. पण, आता #ShivJayanti या हॅशटॅगने त्याला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. या हॅशटॅग वापरुन जवळपास 10 हजार ट्विट्स झाले आहेत. त्या खालोखाल #शिवजयंती हा मराठीतील हॅशटॅग जोरात सुरु आहे. हा हॅशटॅग वापरुन जवळपास 5 हजार ट्विट्स झाले आहेत.
ट्विटरवर सकाळी 10 वाजेपर्यंत भारतात जे पहिले तीन टॉप ट्रेंड आहेत ते सर्व शिवजयंतीचेच आहेत. शिवप्रेमींप्रमाणेच देशभरातील मान्यवर लोकं शिवजयंती निमित्त ट्विट करत आहेत.