Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेक न्यूज तपासण्यासाठी व्हॉट्सअॅपचे Checkpoint Tipline लाँच

Webdunia
मंगळवार, 2 एप्रिल 2019 (17:20 IST)
देशात लोकसभा निवडणुकीच्या आधी फेक न्यूजशी लढण्यासाठी व्हाट्सअॅपने चेक पॉइंट टिपलाइन सादर केले. या माध्यमातून लोक त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीची प्रामाणिकता तपासू शकतात. 
 
व्हाट्सअॅपची स्वामित्व असलेल्या कंपनी फेसबुकने एका वक्तव्यात म्हटलं आहे की ही सेवा भारतच्या एका मीडिया स्किल स्टार्टअप प्रोटोने सादर केली आहे. ही टिपलाइन चुकीची माहिती आणि अफवांचे डेटाबेस तयार करण्यात मदत करेल. यामुळे निवडणुकी दरम्यान चेक पॉइंटसाठी या माहितीचा अभ्यास करता येईल. चेक पॉइंटला एक शोध प्रकल्प म्हणून सुरू केले गेले आहे, ज्यामध्ये व्हाट्सअॅपच्या वतीने तांत्रिकी मदत देण्यात येत आहे. 
 
कंपनीने म्हटलं की देशातील लोक त्यांना मिळणाऱ्या चुकीची माहिती किंवा अफवांना व्हाट्सअॅपच्या +91-9643-000-888 नंबरवर चेक पॉइंट टिपलाइनला पाठवू शकतात. एकदा जेव्हा वापरकर्ता टिपलाइनला ही माहिती पाठवेल तेव्हा प्रोटो त्याच्या प्रमाणन केंद्रावर माहितीची योग्य किंवा चुकीची असल्याची पुष्टी करून वापरकर्त्यास सूचित करेल. या पुष्टीकरणामुळे वापरकर्त्यास हे कळेल की त्याला मिळालेला संदेश योग्य, चुकीचे, दिशाभूल करणारे किंवा विवादित यातून कशा प्रकाराचे आहे? 
 
प्रोटोचे प्रमाणन केंद्र चित्र, व्हिडिओ आणि लिखित संदेश पुष्टी करण्यास सक्षम आहे. हे इंग्रजीसह हिंदी, तेलुगू, बंगाली आणि मल्ल्याळम भाषेच्या संदेशांची पुष्टी करू शकेल. 

संबंधित माहिती

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुढील लेख
Show comments