Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत
, मंगळवार, 28 मे 2019 (14:16 IST)
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या माध्यमाने व्हाट्सएपवरून फेसबुकवर स्टेटस, पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर करू शकाल. अर्थात जर तुम्ही व्हाट्सएपवर असाल तर कुठलेही स्टेटस किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुम्हाला तेथूनच शेअरचे ऑप्शन मिळेल. कंपनी अद्याप या फीचरवर काम करत आहे. त्याशिवाय फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्गने नुकतेच म्हटले होते की व्हाट्सएप, मेसेंजर आणि इंस्टाला मर्ज करून क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजचे ऑप्शन देण्यात येईल. असे वाटत आहे की कंपनीने यावर काम सुरू केले आहे. सध्यासाठी क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेज तर नाही, पण स्टोरी शेअर करून  फीचर जारी करण्यात आला आहे. हे फीचर सध्या बीटा बिल्डमध्ये आहे.
 
वाबीटाइंफोच्या एका रिपोर्टनुसार व्हाट्सएपमध्ये एक नवीन फीचर आहे आहे. ज्यामध्ये व्हाट्सएप स्टेटसाला तुम्ही सरळ फेसबुकवर शेअर करू शकता. सांगायचे तात्पर्य असे की तुम्ही जर व्हाट्सएपवर एखादे स्टेटस टाकत असाल तर त्यालाच तुम्ही फेसबुक स्टोरी देखील बनवू शकता. यासाठी व्हाट्सएप स्टोरीच्या खाली एक ऑप्शन मिळेल.    व्हाट्सएप स्टेटसच्या खाली एक ऑप्शन आहे - ऐड टू फेसबुक स्टोरी. येथे टॅप करून हे स्टेटस तुम्ही फेसबुकवर लावू शकता. अद्याप हे अजून स्पष्ट झालेले नाही की  व्हाट्सएप आणि फेसबुकच्या अकाउंटला आपल्याला लिंक करावे लागणार आहे की कंपनीने आधीपासूनच लिंक करून ठेवले आहे. अर्थात तुमच्या फोनमध्ये फेसबुक एप असेल आणि तुम्ही त्याचा वापर करत असाल तर तुम्ही वॉट्सऐपहून सरळ स्टेटस ऍड करू शकता. त्याशिवाय येणार्‍या काळात असे ही शक्य आहे की व्हाट्सएपच्या माध्यमाने फेसबुकवर स्टेटस, पोस्ट, व्हिडिओज आणि फोटोज देखील शेअर करू शकाल. महत्त्वाचे म्हणजे व्हाट्सएपने नुकतेच गूगल प्ले बीटा प्रोग्रामच्या मध्यमाने एक नवीन अपडेट सबमिट केले आहे जे 2.19.151 वर्जनचे आहे. हे फीचर अद्याप पब्लिक करण्यात आले नाही आहे. कंपनी ह्या फीचरला काही काळ बीटा बिल्डमध्ये ठेवेल आणि त्याच्यानंतर या पब्लिकसाठी जारी करेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या