Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इलॉन मस्कच्या ट्विटरपेक्षा थ्रेड्स अधिक पैसे कमावणार का?

Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2023 (21:22 IST)
टेक अब्जाधिश मार्क झुकरबर्ग आणि इलॉन मस्क पिंजऱ्यातील कुस्ती लढवण्याबाबत विनोद करत आले आहेत. परंतु उद्योगजगतात मात्र त्यांच्यातील लढाईला आधीच सुरूवात झाली आहे.
 
मार्क झुकरबर्ग यांनी ट्वीटरला पर्याय देत 'थ्रेड्स' ॲप आणल्यानंतर केवळ 24 तासांहून कमी वेळेतच या अॅपवर 3 कोटी युजर्सने साईन अप केल्याचा दावा केला जात आहे.
 
म्हणजेच ते समाज माध्यमांच्या विश्वात एक गंभीर विश्वसनीय स्पर्धक म्हणून समोर आलं आहे. परंतु ट्विटरच्या कोट्यवधी युजर्सच्या तुलनेत हा आकडा छोटा आहे.
 
विश्लेषकांना मात्र ही चांगली सुरुवात असल्याचं वाटतं. झुकरबर्ग यांच्यासाठी त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि वॉट्स ॲपच्या 3 अब्जाहून अधिक वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी आणि जाहिरातदारांना त्यांच्यासोबत आणण्यासाठी ही चांगली सुरुवात आहे असं विश्लेषकांना वाटतं.
 
खरंतर गेल्यावर्षी झुकरबर्ग यांच्या मेटाने 117 अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमाई केली. जेव्हा जाहिरातींमधून कमाईचा विषय येतो तेव्हा याबाबतीत त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड मोठा आहे.
 
मस्क यांनी मात्र त्यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लामध्ये जाहिरातींना स्थान दिलं नसल्याचं दिसलं आणि ट्वीटरसाठीही निधी गोळा करण्यासाठी ते पर्यायी मार्ग शोधत आहेत.
 
झुकरबर्ग यांनी म्हटलंय की, सुरुवातीला थ्रेड्स ॲपवरती कोणतीही जाहिरात नसेल, यामुळे संस्थेला ॲप अधिक उत्तम करण्यासाठी वेळ मिळेल. तसंच वापरकर्त्यांनाही यामुळे जाहिरात नसलेल्या पोस्ट्स अविरतपणे पाहता येतील.
 
"आमचा दृष्टीकोन हा इतर उत्पादनांप्रमाणेच थ्रेड्ससाठी समान असेल: आधी उत्पादन चांगलं करा, यानंतर ते 1 अब्ज लोकांपर्यंत पोहचवता येऊ शकेल का हे पाहा , त्यानंतरच कमाईचा विचार करा," असंही त्यांनी लिहिलं आहे.
 
परंतु कालांतराने थ्रेड्सवरील जाहिराती मेटाच्या एकूण महसुलात 1 ते 5 टक्के भर घालू शकतात. यामुळे सर्वांत आशावादी परिस्थितीत 6 अब्ज डॉलर जास्त उत्पन्न मिळू शकते, असं की बांक कॅपीटल मार्केट्सचे, इक्विटी रिचर्स संशोधक जस्टीन पॅटरसन यांनी आपल्या नोटमध्ये म्हटलं आहे.
 
ही रक्कम फार मोठी नाही. पण ही काहीच नाही असंही नाही. विशेषत: अशावेळी जेव्हा कंपनी ॲप्पलच्या कठोर गोपनीयतेच्या नियमांमुळे जाहिरात विक्रीवर झालेल्या परिणामांवर सातत्याने मार्ग शोधत आहे.
 
आणि हे ट्वीटरच्या जवळ जाणारं आहे. 2021 मध्ये मस्क यांनी ट्वीटर घेण्यापूर्वी ट्वीटरने जाहिरांतींमधून 4.5 अब्ज डॉलर महसूल मिळवला होता.
 
युजर्स थांबतील का?
येत्या काळात काही आठवड्यात किंवा महिन्यांमध्ये थ्रेड्स नेमकं कसं काम करतं यावर तो महसूल येईल की नाही हे अवलंबून आहे.
 
मस्क यांनी गुरुवारी प्रत्युत्तर देताना त्यांचे व्यावसायिक सीक्रेट चोरल्याप्रकरणी मेटाविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं वृत्त आहे.
 
परंतु ट्वीटरने अनेकांना निराश केल्याने अनेक लोक दुसरा पर्याय शोधत आहे. त्यातच ट्वीटरच्या वेगवान साईनअपपेक्षा मेटाने थ्रेड्सचे माध्यम “स्वच्छ आणि विनम्र” असेल असं आश्वासन दिलं आहे, असं इनसायडर इन्टिलीजन्स विश्लेषक जॅस्मीन एनबर्ग यांनी म्हटलंय.
 
"आशावादासह पोस्ट करत आहे," असं म्हणत ‘सेक्स अँड दि सिटी’ स्टार सारा जेसीका पारकरनेही आता शकीरा, ओपरा आणि ख्लो कारडेशियन यांच्यासोबत या वादात उडली घेतली आहे.
 
थ्रेड्स ॲपचं यश हे ट्वीटरचे पाॅवर वापरकर्ते किंवा ज्यांनी कधीही साईन अप न केलेल्या लोकांवर अवलंबून आहे, याचीही काहीच खात्री देता येत नाही, असंही विश्लेषकांना वाटतं
 
फॅशन आणि लाईफस्टाईल इन्स्टाग्रामचं ब्रेड आणि बटर आहे, ज्यांनी आजही जाहिरातदारांना आपल्याकडे कायम ठेवलं आहे. यामुळे अशाचप्रकारच्या दुसऱ्या माध्यमाची जगाला आवश्यकता आहे का हे अद्याप स्पष्ट नाही.
 
न्यूज हे ट्वीटरचं एक मुख्य फीचर आहे, पण झुकरबर्ग यांना मात्र बातम्यांमध्ये फारसा रस नाही असं दिसतं. त्यांनी असं म्हटलंय की, सर्वेक्षणानुसार वापरकर्त्यांना त्यांच्या माध्यमांवर हे कमी हवं आहे आणि कॅनडामध्ये कंपनी न्यूज संस्थांना त्यांच्या कंटेंटसाठी पैसे देण्याऐवजी स्थानिक वृत्तांकन ब्लॉक करण्याच्या तयारीत आहे.
 
“बातम्यांचे चाहते आणि ट्वीटरचे निष्ठावंत ट्वीटरला दोष देण्याची शक्यता वाटत नाही आणि मेटाला मात्र नावीन्य संपलं की थ्रेड्स मनोरंजक करावे लागतील,” असं एनबर्ग सांगतात.
 
तसंच ते पुढे म्हणतात, झुकरबर्ग यांच्यावर यापूर्वी उत्पादनांसाठी कॉपी केल्याने टीका करण्यात आली आहे, यामुळे त्यांना कल्पकतेसाठी विशेष प्रयत्न करावे लागले आहेत.
 
नियामकांचा धोका
जाहिरातदार हे सुद्धा पाहणार की ते चुकीची माहिती आणि गोपनीयता यांसारख्या समस्यांशी संबंधित धोका पत्कारून माध्यमांवर पैसा खर्च करत आहेत का.
 
मस्क यांच्याअंतर्गत ट्वीटरला नफ्यासाठी संघर्ष करावा लागला, आता त्यांनी साईटवरील कंटेंट नियंत्रित होण्याबाबत अचनाक बदल करून जाहिरातदारांना दूर केले आहे. तसंच अलिकडेच वापरकर्त्यांनी किती पोस्ट पाहाव्यात यावरही मर्यादा आणली आहे.
 
ट्वीटरच्या व्यावसायिक नुकसानीचा फायदा होणाऱ्यांपैकी मेटा एक आहे, असंही विश्लेषकांना वाटतं. परंतु झुकरबर्ग हे सुद्धा काही स्वच्छ रेकॉर्ड घेऊन येत आहेत असंही नाही.
 
पारदर्शकता आणि अचूक डेटा या मुद्यांवर त्यांच्याही कंपनीचे गेल्या अनेक वर्षांपासून मार्केटर्ससोबत वाद आहेत. तसंच वापरकर्त्यांची माहिती आणि चुकीच्या माहितीमुळे त्यांच्यावर टीका झाली आहे.
 
“जाहिरातदारांना स्वच्छ प्रतिमा हवी आहे, चांगलं वातावरण हवं आहे जिथे कंटेंट नियमितपणे मान्य केलेल्या अटी आणि शर्तींवर नियंत्रित केला जाईल," असं मार्केटींगचे वेटरन लाऊ पास्कालीस सांगतात. “थोडक्यात समाज माध्यमं सध्या जाळलेल्या कचऱ्यासमान झाली आहेत.”
 
जरी फेसबुक डेटिंग अॅप अयशस्वी ठरलं असलं तरी लाँच होण्यापूर्वी मेटाचे शेअर्स 4 टक्क्यांनी वर आले हे झुकरबर्ग यांच्यात काम करून घेण्याच्या क्षमतेवर गुंतवणूकदारांच्या विश्वासाचं प्रतिक आहे, असं दिसतं.
 
ट्वीटरवर ज्याप्रमाणे बातम्या ब्रेक होतात तसं करणं कठीण जाईल, परंतु यामुळे दोघाचं अस्तित्त्व कायम राहण्यासाठी वाव आहे, असंही पास्कालीस म्हणाले. किंवा ते सुचवतात की, हा धोका मस्क यांच्यासाठी “वेक अप कॉल” ठरू शकतो.
 
“थ्रेड्स किती काळ जाहिरातींपासून दूर राहतील हे सुद्धा महत्त्वाचं आहे,” असंही पास्कालीस म्हणतात.
 
“हा काळ कितीही वेळाचा असला तरी ट्वीटरला आपल्या जहाजाची दिशा ठरवण्यासाठी हाच कालावधी आहे."
 



Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

हत्या की अपघात? नागपुरात रस्त्याच्या कडेला पडलेल्या पाईपमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळले

या दिवशी महाराष्ट्रात होत आहे मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला कोणतं खातं मिळणार हे मुख्यमंत्री फडणवीस ठरवणार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप नेतृत्व हस्तक्षेप करणार नाही

एक राष्ट्र, एक निवडणूक' लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

पुढील लेख