चीनी कंपनी शाओमीने भारतात आपला Mi इलेक्ट्रिक टूथब्रश T300 लाँच केला आहे. या ब्रशची किंमत 1299 रुपये इतकी आहे.
क्राउड फंडिंग अंतर्गत लाँच केलेल्या या टूथब्रशला ऑनलाइन किंवा दुकानातून खरेदी करता येईल. याची विक्री 10 मार्चपासून सुरू करणार आहे.
टूथब्रशचे खास वैशिष्ट्ये
25 दिवसांचा बॅटरी बॅकअप
चार्ज करण्यसाठी USB-C टाइप अडॉप्टर
IPX7 वॉट रेसिस्टेंट अर्थात ब्रश पाण्याने धुता येईल.
DuPont TyneX StaClean ब्रिसल्स
ब्रशला प्लास्टिक हेड असल्याने स्टोर करणे सोपे आहे. यातील DuPont TyneX StaClean ब्रिसल्समुळे ब्रश दोन दातामध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सफाई करू शकते. या ब्रशमध्ये मॅग्नेटिक लेविटेशन सोनिक मोटरचा वापर केला असून 1 मिनिटात 31000 वेळा व्हायब्रेट होण्याचा दावा केला जात आाहे.
या टूथब्रशला पांढऱ्या रंगात लाँच करण्यात आले आहे.