Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हच्यरुअल की-बोर्ड

Webdunia
आपल्याला काळ्या बटणांचा संगणकाचा की-बोर्ड माहीत आहे. वायरलेस की बोर्डबद्दलही आपण ऐकलंय. पण आता वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित की-बोर्डस् बाजारात दाखल झाले आहेत. ब्लूटूथ, यूएसबी, एचडीएमआय कनेक्टिव्हिटीवाल्या की-बोर्डस्ची सध्या चांगलीच चलती आहे. त्यातच आता लेझर तंत्रज्ञानावर आधारित की-बोर्डही तयार करण्यात आले आहेत. लेझर लाईटवर चालणारे हे की-बोर्ड पाहिल्यावर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. लेझर प्रोजेक्शन व्हच्यरुअल की-बोर्ड असं याचं नाव आहे. 
 
दोस्तांनो, लेझरवर चालणारा की-बोर्ड प्रत्यक्षात नसतोच. लेझर लाईटच्या मदतीनं एक व्हच्यरुअल म्हणजेच आभासी की-बोर्ड तयार केला जातो. या की-बोर्डवर तुम्हाला काम करायचं आहे. आहे ना गंमत! लेझरमधून बाहेर पडणार्‍या लाल रंगाच्या किरणांनी हायटेक की-बोर्ड तयार होतो. 
 
प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला असा की-बोर्ड वापरणं हा खूपच गमतीशीर अनुभव असेल. अनेक कंपन्यांनी अशा प्रकारचे की-बोर्डस् बाजारात उतरवले आहेत. आयफोन, आयपॅड, स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इतर कोणत्याही ब्लू टूथ डिव्हाइसवर काम करण्यासाठी या की-बोर्डचा वापर करता येईल. हा की-बोर्ड बॅटरीवर चालतो. ऑन केल्यानंतर त्यातून लाल रंगाची लेझर किरणं बाहेर पडतात. त्या किरणांपासून एक की-बोर्ड तयार होतो. हा आपल्या नेहमीच्या की- बोर्डसारखाच असतो. टाईप केल्यानंतर यातून बीप असा आवाज येतो. पण हा की-बोर्ड वापरण्यासाठी सपाट पृष्ठभाग असणं गरजेचं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुढील लेख
Show comments