Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई-वडिलांचा खोडकर मुलगा होता कारगिल युद्धाचा नायक सौरभ कालिया

Webdunia
जगासाठी नायक आणि कुटुंबासाठी ‘शरारती’ कॅप्टन सौरभ 1999 च्या कारगिल युद्धाच्या सुरुवातीला शहीद झालेल्या सैनिकांपैकी एक होते. ते भारतीय सेनेच्या त्या 6 जणांपैकी एक होते ज्यांचे क्षत- विक्षत शव पाकिस्तानद्वारे सोपवण्यात आले होते.
 
कारगिल युद्धाच्या सुरुवातीला देशासाठी आपले प्राण गमावणारे कॅप्टन सौरभ कालिया यांचे आई- वडिलांकडे आज देखील त्यांनी हस्ताक्षर केलेल्या एका चेकला आपल्या मुलाची आठवण म्हणून सांभाळलेला आहे. सौरभ यांनी कारगिलसाठी निघण्यापूर्वी यावर हस्ताक्षर केले होते.
 
सौरभ यांचे वडील नरेंद्र कुमार आणि आई विजय कालिया यांना आज देखील ते क्षण व्यवस्थित लक्षात आहे, जेव्हा 20 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला (सौरभ) शेवटचे बघितले होते. तेव्हा सौरभ 23 वर्षाचे देखील नव्हते आणि आपल्या ड्यूटीवर जात होते परंतू हे माहीत नव्हतं की कुठे जायचे आहे.
 
ब्लैंक चेक आहे शेवटची आठवण : 
हिमाचल प्रदेशाच्या पालमपुर स्थित आपल्या घरातून त्यांच्या आई विजय यांनी फोनवर सांगितले की 'ते (सौरभ) स्वयंपाकघरात आले आणि रक्कम न भरता हस्ताक्षर केलेलं एक चेक माला सोपवले आणि मला त्यांच्या बँक 
खात्यातून रुपये काढायला सांगितले कारण ते फील्डमध्ये जात होते.'
 
सौरभ यांनी हस्ताक्षर केलेला तो चेक त्यांनी लिहिलेली शेवटली आठवण आहे, ज्याला कधीच वापरलं जाऊ शकत नाही. त्यांच्या आई यांनी सांगितले की हा चेक माझ्या शरारती मुलाची शेवटली, प्रेमळ आठवण आहे.
 
वाढदिवसाला येईन असा वादा केला होता
त्यांच्या वडिलांनी सांगितले की 30 मे 1999 रोजी त्यांच्यांशी शेवटलं बोलणे झाले होते, तेव्हा त्यांच्या लहान भाऊ वैभव यांचा वाढदिवस होता. त्यांनी 29 जून रोजी वाढदिवसाला येण्याचा वादा केला होता. परंतू ते 23 व्या वाढदिवसाला येण्याचा वादा पूर्ण करू शकले नाही आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान केले.
 
सौरभ यांची खोली आता संग्रहालय
विजय यांनी म्हटले की ते वेळेपूर्वी आले पण तिरंग्यात लपेटून. हजारो लोकांना धक्का बसला होता आणि माझ्या मुलाच्या नावाने नारे लावले जात होते. मी अभिमानी आई होती पण मी काही मौल्यवान वस्तू गमावून चुकलेली 
होती.
 
पालमपुर स्थित त्यांची खोली सौरभ यांना समर्पित असून एका संग्रहालयासारखी दिसते. राष्ट्रासाठी बलिदानानंतर लेफ्टिनेंट यांना मरणोपरांत कॅप्टन या रूपात पदोन्नती देण्यात आली. सैन्य अकादमीमध्ये असताना माझ्या वस्तू ठेवण्यासाठी वेगळी खोली असावी असं तो म्हणायचं, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले.
 
त्यांनी सांगितले की आम्ही त्यांची ही मागणी पूर्ण करणारच होतो पण त्यापूर्वीच ते आपल्या पहिल्या ड्यूटीवर निघून गेले आणि नंतर त्यांच्या शहीद होण्याची बातमी आली.
 
जन्मा झाल्यावर डॉक्टर म्हणाले होते नॉटी आहे आपला मुलगा 
त्यांच्या आई यांनी सौरभ यांच्या जन्म झाला तेव्हाची आठवण सांगितले की आम्ही त्यांना शरारती म्हणायचे कारण त्यांचा जन्म झाला असताना त्यांना माझ्या मांडीत देणार्‍या डॉक्टरांनी म्हटले होते की आपला मुलगा नॉटी आहे. 
 
नंतर त्यांच्या मुलाची शहादत आंतरराष्ट्रीय बातमी झाली होती. कारण, पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांच्यासोबत बर्बर व्यवहार केला होता.
 
सौरभ ‘4- जाट रेजीमेंट’ हून होते. ते पाच सैनिकांसोबत जून 1999 च्या पहिल्या आठवड्यात कारगिलच्या कोकसरमध्ये एक टोही मिशनवर गेले होते. परंतू टीम बेपत्ता झाली होती आणि त्यांच्या बेपत्ता होण्याची पहिली बातमी पाकिस्तानाच्या ताब्यात असलेल्या कश्मीरमध्ये अस्कार्दू रेडिओवर प्रसारित झाली होती.
 
सौरभ आणि त्यांच्या टीमचे (अर्जुन राम, बंवर लाल, भीखाराम, मूला राम आणि नरेश सिंह) क्षत विक्षत मृतदेह नऊ जून रोजी भारताला सोपवण्यात आले होते. दुसर्‍याच दिवशी पाकिस्तानाच्या क्रूर व्यवहाराची बातमी प्रसारित झाली होती. मृतदेहांचे काही अवयव नव्हते. त्यांचे डोळे फुटलेले होते आणि नाक, कान व जननांग कापलेले होते.
 
दोन्ही देशांमध्ये सशस्त्र संघर्षाच्या इतिहासात एवढा क्रूरपणा कधीच बघण्यात आला नव्हता. भारताने याला आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन असल्याचे सांगत आपली नाराजी जाहीर केली होती. सौरभ यांच्या वडिलांनी भरलेल्या गळ्याने म्हटले की माझा मुलगा वीर होता आणि नक्कीच त्यांनी खूप वेदना सहन केल्या असतील.
 
सौरभ यांचे भाऊ वैभव त्यावेळी केवळ 20 वर्षांचे होते आणि त्यांनी आपल्या शहीद भावाला मुखाग्नि दिली होती. ते आता 40 वर्षाचे झाले असून हिप्र कृषी विश्वविद्यालयात सहायक प्राध्यापक वैभव यांनी सांगितले ते (सौरभ) आई-वडिलांच्या रागापासून वाचवत होते. आम्ही घरात क्रिकेट खेळायचो आणि अनेकदा मी खिडकीचे काचे फोडले पण जबाबदारी ते स्वत:वर घेत होते.
 
दोन मुलांचे वडील वैभव यांनी सांगितले की त्यांचे मुले आपल्या काकांच्या शौर्य गाथा ऐकून खूप प्रभावित आणि प्रेरित आहे. पार्थ (13) वैज्ञानिक बनू इच्छित आहे आणि सेनेसाठी देखील काही करण्याची त्यांची इच्छा आहे जेव्हाकि व्योमेश (11) सेनेत जाऊ इच्छित आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख