Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कतरीनाला सतावतेय वडिलांची आठवण

Webdunia
IFM
कतरीना कैफ यशस्वीतेच्या शिखराकडे वाटचाल करत आहे आणि तिच्या पाठिशी तिचे कुटुंबिय आहे. फक्त त्या कुटुंबात तिचे वडिल तेवढे नाहीत. कतरीनाला सध्या दुःख आहे ते हेच. कतरीना आणि तिच्या सात बहिणींना वाढवले ते तिच्या आईने. तिची आई यशस्वी वकिल आहे. शिवाय ती सामाजिक संस्थेसाठी कामही करते. आईनेच आपल्याला वाढवले हे ती कृतज्ञतेने सांगते, पण त्याचवेळी वडिलांचीही आपल्याला आठवण येते हे सांगायला ती विसरत नाही.

कतरीनाचे आई-वडिल लहानपणीच वेगळे झाले. आता त्यांच्यात काहीही संपर्क नाही. कतरीना सांगते, ' एखाद्या कुटुंबात भक्कम आधार असलेले वडिल मी माझ्या मित्रमंडळींमध्ये पहाते तेव्हा मला फार वाईट वाटतं. मला असे वडिल का नाहीत, असे विचार येतात. पण तक्रार करत बसण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्याविषयी मी समाधान मानते'.

पण मग आता कतरीना स्टार झाल्याचे कळाल्यानंतर तिचे वडिल आता कुटुंबात परत येणार नाहीत काय? या प्रश्नावर कतरीना नाही असे उत्तर देते. आपले वडिल अतिशय सभ्य गृहस्थ असून ते चांगल्या कुटुंबातून पुढे आलेले आहेत. पण काही प्रश्न कुटुंबात उद्भवल्याने ते दूर गेले. आता मुलीला स्टारडम मिळाले म्हणून परत येणार्‍यातले ते नाहीत, असं ती स्पष्ट करते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

Show comments