rashifal-2026

कतरीना कैफ- नंबर वन

Webdunia
IFMIFM
बॉलीवूडमध्ये सध्या नंबर वन नायिका कोण आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर कतरीना येईल. या उत्तराने तुम्ही कदाचित चक्रवाल. पण नीट गृहितक बघितल्यास तुमचाही यावर विश्वास बसेल.

कतरीनाचे वय तिच्या साथीला आहे. ती सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासारख्या 'वय झालेल्या' अभिनेत्यांबरोबरही शोभून दिसते आणि नील नितिन मुकेश आणि रणबीर कपूर यांच्याबरोबरही 'जचते'.

बिपाशा बसू, ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा या बॉलीवूड गाजविणार्‍या सशक्त अभिनेत्री आता वय वाढल्याने हद्दपार होऊ लागल्या आहेत. कॉलेजमध्ये जाणार्‍या युवा नायकांसोबत त्या शोभत नाहीत. म्हणूनच कतरीनाला यांच्याकडून धोका नाही. राणीसारखी भलेही ती सशक्त अभिनेत्री नसेल. पण स्टार व्हॅल्यू मोठी असल्याने ती चित्रपट यशस्वी करू शकते. शिवाय तिची लोकप्रियता मोठी आहे. राहिला प्रश्न अभिनयाचा ती त्यात सुधारणा करतेच आहे.

जेनेलिया, असीन, सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा या भविष्यात तिला आव्हान देऊ शकतात. पण त्यांची स्टार व्हॅल्यू आज तरी तितकी नाही. त्यामुळे कतरीनाशी स्पर्धेत त्या मागे पडतात.

कतरीनाला खरे आव्हान आहे ते प्रियंका चोप्रा आणि करीना कपूरचे. या दोघीही तिच्याच वयाच्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत त्या तिच्यापुढे आहेत. पण राजनीती आणि 'अजब प्रेम की गजब कथा' हे दोन चित्रपट कतरीनाच्या अभिनयासाठी ओळखले जाऊ शकतील.

यशस्वीतेचा मुद्दा पाहिला तर प्रियंकाचे जेमतेम दोन चित्रपट हिट ठरलेत. करीनाचे एकामागोमाग एक फ्लॉप ठरलेत. त्या तुलनेत कतरीना दणादण हिट चित्रपट देतेय. त्यामुळेच कतरीना आता नंबर वनला पोहोचली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

Rahat Fateh Ali Khan Birthday राहत फतेह अली खान यांनी त्यांच्या सुरांनी स्वतःचे वेगळे साम्राज्य निर्माण केले

रणवीर सिंगच्या "धुरंधर" चित्रपटाने नवीन वाद निर्माण केला, बलुचिस्तानने चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला

Show comments