Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॅपी बर्थ डे कतरीना

Webdunia
IFM
सुपरहिट कतरीना
कतरीना कैफचा जन्म १६ जुलै १९८४ ला झाला. आज ती वयाची २५ वर्षे पूर्ण करतेय. लहान वयातच कतरीनाने मोठ्या यशाला गवसणी घातलीय. सलग हिट चित्रपट देऊन तिने बॉलीवूडच्या अनेक प्रस्थापित नायिकांची झोप उडवून दिलीय. कतरीना चित्रपटात असेल तर तो यशस्वी होतो, असे एक नवे समीकरण तिने जन्माला घातलेय.


IFM
स्टार कतरीना
हल्ली 'स्टार कलावंत' ही संकल्पनाच नाहीशी होतेय. अपवाद कतरीनाचा. कतरीना स्टार आहे. तिच्यात कमतरता आहे हे माहित असूनही आज कतरीना हे बॉलीवूडमधलं चलनी नाणं आहे. अभिनयात तिला अजून बरीच मजल मारायची आहे. पण निसर्गदत्त सौंदर्य नि निरागस चेहरा अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. म्हणूनच तिची लोकप्रियात आभाळाला जाऊन पोहोचलीय.


IFM
स्वबळावर यशाची कमाई
' बूम' (२००३) या अपयशी चित्रपटापासून सुरवात करणार्‍या कतरीनाची सुरवातीची ओळख सलमान खानची गर्लफ्रेंड अशीच होती. तिला हिंदीही नीट बोलता येत नव्हतं. पण तिने कठोर मेहनत घेतली. आता ती हिंदीही चांगलं बोलते शिवाय तिच्या अभिनयातही सुधारणा झालीय. स्वबळावर तिने इथपर्यंत मजल मारलीय.


IFM
सेक्सी आणि पॉप्युलर
कतरीनाचे फोटो इंटरनेटवर सर्वाधिक डाऊनलोड केले जातात. जगातील सेक्सी महिला म्हणून तिची निवडही झालीय. तिची लोकप्रियता किती आहे याचे हे पुरावे. आता राजनीती, अजब प्रेम की गजब कहानी यातून तिचा अभिनय येत्या काळात पहायला मिळेल. कतरीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

Munjya 2 Release Date : 2024 ची बेस्ट हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चा पार्ट-2 कधी येणार जाणून घ्या

बंदिश बँडिट्सची अभिनेत्री श्रेया चौधरीने शेअर केला तिचा प्रेरणादायक प्रवास

मी ठीक आहे', इमारतीला लागलेल्या आगीनंतर उदित नारायण यांनी दिले अपडेट

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी संध्या थिएटर दुर्घटनेत जखमी झालेल्या श्री तेज याची भेट घेतली

पटवांची हवेली जैसलमेर

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला