मी अनेक प्रसंगी अनेकांना मिठाई पाठवली असेल पण त्यांना मत देणार नाही असे ममता म्हणाल्या आहेत. हुगली जिल्ह्यातील प्रचार सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलत होत्या. मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पुजेदरम्यान उपहार पाठवते आणि चहा पाजते पण मी त्यांना एकही मत देत नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
बांगलादेशचा पंतप्रधान हसीना शेख या मला दरवर्षी ढाकातून खास मिठाई पाठवायच्या. माझ्या कट्टर विरोधकांमध्ये असलेल्या ममता बॅनर्जी यांना याबद्दल कळाले तेव्हापासून त्या स्वत: माझ्यासाठी कुर्ता निवडतात आणि दरवर्षी उपहार पाठवतात असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. या अशा वक्तव्याने लोकसभा निवडणुकीत कदाचित मला नुकसान होऊ शकते असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते.