Festival Posters

लोकसभेची इव्हीएम व व्हीव्हीपॅट मधील मतमोजणी कशी होते, जाणून घ्या सविस्तर

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (08:40 IST)
देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव सुरु झाला आहे. मात्र अनेकांना प्रश्न पडला आहे की लोकसभेची ही मतमोजणी कशी होणार आहे, कश्या प्रकारे मशीन्स तपासल्या जाणार असून, त्यामुळे निकाल कधी लागणार. त्याबद्लची ही सर्वसाधारण माहिती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या साधारण 18 ते 20 फेऱ्या होतील. तर  एका फेरीसाठी साधारणपणे 30 मिनीटे लागतात. 1 फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. तर  EVM मधील मतांची मोजणी सोबतच VVPAT व्हीव्हीपॅट मतांची मोजणी होईल. त्यामुळे प्रत्येक स्थितीत प्रत्येक फेरीसाठी जवळपास 40 ते 45 मिनीटे लागणार आहेत. त्यामुळे निकाल घोषित होण्यास उशीर होईल. मतदान मोजणीच्या दिवशी सकाळी 7 वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत EVM यंत्रे मतमोजणीसाठी स्ट्राँग रुममधून बाहेर येथील, मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी असणार आहेत. एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे. तर एका विधानसभा मतदारसंघातील 5 VVPAT मशिनची मते, प्रत्यक्ष EVM ची मते यांची पडताळणी करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. तर VVPAT मते, प्रत्यक्ष EVM मते यात फरक आढळल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला कळवणार आहे. त्यानंतर आयोग यावर अंतिम निर्णय देईल. तर दुसरीकडे मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर पूर्ण  बंदी टाकण्यात आली आहे. सोबतच आज 23 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रथम  पोस्टल मतदानाची मोजणी होईल. असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना 15 व्यांदा तुरुंगातून सोडण्यात येणार, 40 दिवसांचा पॅरोल मंजूर

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी ठरलं

आमदार संजय मेश्राम यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, मतदान केंद्रात अडथळा आणल्याचा खटला रद्द

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

पुढील लेख
Show comments