मुंबई: लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवणे महागात पडू शकतं कारण यासाठी मुंबईत दोनशे अधिकारी सज्ज राहणार आहेत. प्राप्तिकर विभागाचे महासंचालक किशोर कुमार व्यवहारे यांनी ही माहिती दिली आहे.
प्रचारमोहीम दरम्यान मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याची माहिती हेल्पलाईनवर(1800221510) कळवता येईल. माहिती पुरवणार्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. काळा पैसा तसेच किमती वस्तूंचे देण-घेण यावर लक्ष ठेवण्यात येईल. माहिती मिळाल्यावर तासाभरात पथके घटनास्थळी पोहचून सहा तासांत कारवाई पूर्ण करण्यात येईल.
एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा कुठल्याही जागी अनुचित आर्थिक व्यवहार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. सामान्यत: 10 लाखांपेक्षा जास्त बेहिशबी रक्कम सापडली तरच जप्त केली जाते. तसेच रकमेची नोंद व तपशील संबंधित प्राप्तिकर अधिकार्याला दिली जाते.
प्राप्तिकर विभागाचे सहकारी बँका व सहकार क्षेत्रावरही लक्ष आहे. तसेच संशयाने विनाकारण कारवाई करता येत नाही. ठोस पुरावे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले.