लोकसभा निवडणूक निकालाचे अूचक भाकित वर्तविण्याचा दावा करणाऱ्या ज्योतिषांची परीक्षा घेण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे. निवडणूक निकालासंबंधी त्यांना पाच प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्याची अचूक उत्तरे देणाऱ्यांना रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे. फलज्योतिष हे शास्त्र असून त्या आधारावर भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या ज्योतिषांनी हे आव्हान स्वीकारावे, असे आव्हान समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिले आहे.
निकालांचे अचूक भाकित वर्तविण्याचे दावे ज्योतिषी करत असतात. त्यातून अंधश्रद्धेला अधिकच बळकटी मिळते. अशा प्रवृत्तीच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे. मागील निवडणुकीतही ज्योतिषांना २१ लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.