Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठवाड्यात मोदींची कॉंग्रेसवर सडकून टीका

Webdunia
बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:42 IST)
काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून देशाच्या सुरक्षेची अवस्था बिकट बनली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू-काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान पाहिजे असलेल्यांच्या बाजूने उभी आहे, असा आरोप करताना काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा नाही मात्र, शरदराव तुम्हाला हे शोभतं का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.लातूर येथील औसा येथे आज महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली, यावेळी मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन काँग्रेससह महाआघाडीवर सडकून टीका केली. लातूर आणि उस्मानाबदच्या उमेदवारांसाठी ही प्रचार घेण्यात आली. भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोठा भाऊ म्हणून संबोधले. मोदी म्हणाले, काँग्रेसने जर देशाची फाळणी होऊ नये यासाठी १९४७ मध्ये एकजूट झाली असती तर पाकिस्तान निर्माणच झाला नसता. काँग्रेसने आपला चेहरा आरशात पहावा कारण त्यांना मानवाधिकाराची भाषा शोभत नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचाही मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काश्मीरमधील फुटिरतावाद्यांसोबत आहे. मोदी पुढे म्हणाले, सशक्त भारत बनवण्याचा संकल्प आम्ही देशासमोर ठेवला आहे. तसेच सुशासन हाच आमचा मंत्र आहे. या भावनेनेच नव्या भारताच्या निर्माणासाठी आम्हाला देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हवा आहे. एकीकडे आमच्याकडे धोरण आणि दुसरीकडे विरोधकांची विरोधी भुमिका आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर घुसून मारू ही नव्या भारताची निती असल्याचा पुनरुच्चार मोदींनी यावेळी केला. जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही राष्ट्रवादाची भावना रुजवली तिथली परिस्थिती आता सामान्य आहे. घुसखोरी पूर्णपणे बंद करण्याचा आमचा संकल्प आहे. यासह मोदींनी लातूरमधील जिव्हाळा असलेल्या पाणी प्रश्नावर बोलत असताना ते म्हणाले की या भागासाठी शाश्वत पाणी साठ्य़ाची निर्मीती करणार असल्याचे मोदी म्हणाले. लातुरमध्ये तयार होत असलेला देशातील चौथा रेल्वे बोगीचा कारखाना म्हणजे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार अस्सल्याचे मोदी म्हणाले. मंचावर दोन्ही मतदार संघातील उमेदवरांसह विद्यमान खासदार उपस्थित होते.  

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments