Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवार यांचे नातू पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आजोबांनी केला प्रचाराला सुरुवात

शरद पवार यांचे नातू पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आजोबांनी केला प्रचाराला सुरुवात
, सोमवार, 18 मार्च 2019 (08:35 IST)
पिंपरी-चिंचवड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे #मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ  सभेत फोडण्यात आला.
 
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार उपस्थित होते. या सभेच्या दरम्यानच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. पवारसाहेबांनी प्रथम पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली व मग त्यानंतर त्यांनी सभेला संबोधित केले.
 
या सभेला संबोधित करताना विधिमंडळ नेते आ. अजित पवार म्हणाले, "लोकसभेत चांगल्या पद्धतीने प्रश्न सोडवले गेले पाहिजे. शिरूरमधून लोकसभेत कोल्हेना पाठवायचं आणि मावळ मधून पार्थला. विनाअट शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून जावे यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत. भाजपा काळात महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या. शास्ती कर आणि अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याबाबत सांगितलं जात आणि निवडणूक झाल्या की भाजपाचे सगळे लोक हे विसरतात.राफेल विमानाबाबत उत्तर देत नाहीत. राफेलची कागदपत्रे चोरीला जातात. धनगर आरक्षणाची कागदपत्रे गहाळ झाली. त्याबाबत उत्तरही देत नाहीत. पळवाटा काढतात.नेता शरद पवार यांच्यासारखा असावा लागतो. फोर्ड मोटर्स मधील कामगारांना 14 वर्षा नंतर कामावर घेण्यात आले. शरद पवार यांच्या मध्यस्तीने हे काम झालं.निवडणूक आली की प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचं. मंदिर बांधायचं मधेच काढतात. साडेचार वर्ष काय झोपा काढल्या काय? जो माणूस वडिलांचं स्मारक बंधू शकत नाही. तो काय मंदिर बांधणार? नितिन गडकरी स्वतः म्हणतात या सरकारमध्ये मला काम करू देत नाहीत. संविधान बदलण्याची भाषा हे सरकार करतंय. जगात आपलं संविधान सर्वात श्रेष्ठ आहे. असं असताना ते बदलण्याची भाषा करत आहेत. येणारी निवडणूक फार महत्वाची आहे. राष्ट्रवादी आणि सगळे मित्रपक्ष यांना निवडून देण्याचं काम जनतेने करायचं आहे."राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील या सभेला संबोधित करताना म्हणाले, "मावळला सर्वांच्या मनातला खासदार मिळाला आहे. मावळ लोकसभेतल्या सर्व घराघरात लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून पार्थ यांना उमेदवारी दिली. अनेक उमेदवार चांगले होते. परंतु सर्वांचा दुजोरा पार्थ पवार यांना होता. म्हणून त्यांना उमेदवारी दिली.भाजपा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करणार आहे. जातीयवाद पेटवण्याची काम करणार. सावधानतेने ही निवडणूक लढवली पाहिजे. भाजपाने देशावर 51 लाख कोटी रुपयांचं कर्ज आता 82 लाख कोटी इतकं वाढवलं. चौकीदार महाशय म्हणतात की न खाउंगा न खाने दूंगा. पण रिझर्व्ह बँकेचं वाटोळं करण्याचं काम यांनी केलं."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच 63 वर्षाच्या वयात निधन